राष्ट्रीय महामार्ग ६ वर भीषण अपघात, २ लक्झरी बसची समोरासमोर धडक

0
7890
Google search engine
Google search engine

मलकापूर (बुलढाणा) – अंबरनाथवरुन हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरीला विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या लक्झरीने जोरदार धडक दिली. त्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात 5 जण ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. यातील अत्यवस्थ 6 जणांना बुलढाणा हलविण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाणपूलावर आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

 

हिंगोली येथील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्सरी बस क्र‌. ‌एम.एच‌.०८/ ९४५८ ही अंबरनाथवरुन ४० प्रवाशांना घेऊन परतीच्या वाटेवर होती‌. आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या क्र.एम.एच. २७ बी.एक्स.४४६६ या बसने समोरच्या बसला चालकाच्या बाजूने चिरत पुढे गेली‌. त्यामुळे समोरासमोर आलेल्या दोन्ही लक्झरी बसेसमध्ये भीषण अपघात झाला.