वांगी येथील ग्रामसेवकाची बदली करा : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*

Google search engine
Google search engine

*वांगी येथील ग्रामसेवकाची बदली करा : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सांगली/कडेगांव न्युज:
कडेगांव तालुक्यातील वांगी येथील ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवक विकास सुतार याची बदली करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विकास सुतार हे वांगी येथे गेली सात वर्षे झाले प्रभारी ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करत आहे. त्यांचा कारभार हा मनमानीपणे सुरू आहे. ग्रामस्थांशी ते उद्धटपणे वागत आहेत. घरपट्टी व पाणीपट्टी च्या नोंदी योग्य पद्धतीने न ठेवल्याने ग्रामस्थांच्या कडून जादा घरपट्टी व पाणीपट्टीचे पैसे वसूल केले जात आहेत. ग्रामपंचायत कर वसुलीसाठी त्यांचेकडून कसलेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी आहे. शासकीय योजना राबविताना लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. ग्रामसभेमध्ये झालेल्या ठरावांची नोंद घेतली जात नाही. ग्रामसभेमध्ये झालेल्या ठरावांची कार्यवाही करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही दाद देत नाही. ग्रामसेवक विकास सुतार यांच्या कारभारास जनता कंटाळली आहे. यामुळे ग्रामस्थांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. त्यामुळे ग्रामसेवक विकास सुतार याची तात्काळ बदली करण्यात यावी. तसेच पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी द्यावा. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावरती जिव्हाळा जनकल्याण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष कृष्णत मोकळे, माजी उपसभापती रवींद्र कांबळे, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष भानुदास शिंदे, शक्तीकेंद्र प्रमुख राजेंद्र मोहिते, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब वत्रे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष अमोल होलमुखे, ग्रामपंचायत सदस्य बुवाजी देशमुख, ऋतुराज देशमुख, शरद मोहिते, प्रविण मोहिते, बाळकृष्ण मोहिते, अभिजित देशमुख, रोहन देशमुख, अनिकेत कांबळे, विश्वजीत देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.