कडेगांवातला ऐतिहासिक मोहरम..

Google search engine
Google search engine

 

 

 सा

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगांवातला ऐतिहासिक मोहरम.

दोन समाजातील तेढ त्यातून उद्भवणाऱ्या दंगली असे प्रकार दररोज आपल्याला ऐकावयास पहावयास मिळतात जातीय सलोखा राखा अशा जाहिराती वारंवार प्रसार माध्यमाद्वारे बिंबूनही फारसा परिणाम झाल्याची दिसत नाही.पण अशा कुठल्याही जाहिराती न करता सर्वधर्मसमभावाचा केवळ आव न आणता तो वर्षानुवर्षी टिकून ठेवला आहे. कडेगावच्या रहिवाशांनी कडेगाव चा मोहरम हे सर्वधर्मसमभावाचे सर्वांनीच अनुकरण करावे असे आदर्श उदाहरण आहे. कडेगाव शहर हे कराड पासून 18 किलोमीटर तर विट्यापासून 22 km वर वसलेले गाव आहे दक्षिणेला जागृत असे डोंगराई देवीचे पवित्र मंदिर पश्चिमेला कडेगावचा पाणीपुरवठा करणारा भव्य असा जलाशय डोंगराच्या दोन्ही पायथ्याला दोन सूतगिरण्या गावात विविध शैक्षणिक संकुले नव्याने झालेले तहसील कार्यालय पंचायत समिती नगरपंचायत यामुळे गावाचे नैसर्गिक वातावरण खुलून दिसते. कडेगाव मध्ये 1885 साली मोहरम होत होता असे बोलले जाते मोहरम निमित्त गावात एकूण 14 ताबूत बसवले जातात त्यापैकी सात ताबूत हिंदूंचे असतात सात सात ताबूतांची उंची शंभर फुटून अधिक असते मोहरम सणाचा मानपान हा हिंदू बांधवांना असतो असा हा आगळावेगळा मोहरम सण म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याची संपूर्ण हिंदुस्तानातील एक आदर्श उदाहरण म्हणावे लागेल. मोहरम सणात राष्ट्रीय एकात्मतेची गाणी गायली जाऊन राष्ट्रीय एकात्मता साधली जाते असा हा मोहरम सण कडेगावातील हिंदू मुस्लिम मंडळी हातात हात घालून मोठ्या उत्साहात साजरा करतात कडेगावच्या ताबूताचे वेगळे वैशिष्ट्य आहे ताबूत हा बांबूच्या साह्याने तयार केला जातो चिकन माती सुती दोऱ्या मडवून हे बांधकाम करतात हे बांधकाम करीत असताना कोठेही गाठ मारत नाहीत ताबू ता ची उभारणी कळसाकडून पायाकडे केली जाते. सर्वात वरच्या बाजूस कळस त्याच्याखाली तुकोणी या करायची मजली असे 21 मजले असतात मजल्या खाली मला मोठा चौकडा त्याच्याखाली पलंगडी हे बांधकाम करताना बांधकाम शास्त्राचा आधार घेऊन केली जाते. त्यामुळे ताबूत एका दोरी दिसतात ताबूतांच्या उंची बरोबर येथील लोकांची मनाची उंची देखील खूप मोठी आहे. एक ताबूत 100 ते 150 फुटाचा असल्याने तो उचलण्यासाठी लोकांची गरज असते.एका ताबूतास सात ते आठ तोरण्या असतात प्रत्येक तोरणीस दोन ते तीन माणसे असतात. मोहरम सणात सुतार शेटे देशपांडे कुलकर्णी यांना मान दिला जातो .असा हा आगळावेगळा मोहरम सण कडेगावच्या आसपासच्या भागातील लोक एकत्र येऊन साजरा करतात. त्याच बरोबर मोहरमच्या आधी पाच दिवस सोंग निघतात. त्यात इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयीची गीतेच नव्हे तर नाथ संप्रदायातील व महाभारतातील ही काव्य गायली जातात. हिंदूंना जसा मोहरमचा मान आहे तसा गावातील मुस्लिम समाजालाही हिंदूंच्या सणांमध्ये मान दिला जातो दसऱ्याच्या दिवशी व यात्रे दिवशी पालखी उचलण्याचा मान गणपती सणांमध्ये आरतीत सहभागी होण्याचा मान मुस्लिमांना असतो अशा रीतीने हिंदुस्थानात सांगली जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य असलेल्या कडेगाव शहरात अतिशय उत्साहाने धार्मिक सण सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात.इथून पुढेही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कडेगाव सारख्या गावात गणपती सण असो दसरा असो वा मोहरम असो या उत्सवातून राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल अशी आशा वाटते.