जगतगुरु संत तुकाराम महाराज अभ्यासिकेत कार्यशाळा संपन्न

0
208
Google search engine
Google search engine

जगतगुरु संत तुकाराम महाराज अभ्यासिकेत कार्यशाळा संपन्न

शेगांव:- सध्या महाराष्ट्रात अनेक नोकर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत परंतु त्या जाहिरतींचा लाभ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज अभ्यासिका येथे नगरपरिषद संचालनालयाच्या निघालेल्या भरती प्रक्रियाची माहिती देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यभर विविध विभागातून नोकर भरती होत आहे त्या जाहिरतींची सखोल माहिती एमपीएससी, कृशिसेवा, बैकिंगसेवा, सरळसेवा, तलाठी भरती, नगरपालिका संचालनालय भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून दि. २८ जुलै रोजी शेगांव नगर परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपअभियंता इंजी. संजय मोकासरे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा संपन्न झाली. उपअभियंता मोकसरे यांनी विद्यार्थ्यांना न.प. च्या भरतीची संपूर्ण परीक्षा पद्धती आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. जाहिरातीची फोड करीत सोप्या भाषेत जाहिरात विद्यार्थ्यांना समजून सांगितली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करीत परीक्षा अर्ज भरतांना घ्यावयाची काळजी विषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी काळातील परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी अभ्यासिका ग्रंथपाल रीना सोळंके, सहायक ग्रंथपाल रामचंद्र पवार आणि अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.