कडेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Google search engine
Google search engine

*कडेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन् *

सांगली/कडेगांव न्युज:

शरद फाउंडेशन, कुंडल संचिलीत शरद आत्मनिर्भर अभियान पलूस, कडेगाव तसेच कडेगाव शहर यांचे संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर उदघाटन सोहळा मा. शरद (भाऊ) लाड यांचे हस्ते संपन्न झाला..
दर महिन्याला अशा पद्धतीचे रक्तदान शिबीर आयोजित करून रक्ताचा तुटवडा भासू न देण्याचा संकल्पच या माध्यमातून पलूस कडेगाव चे युवा नेते मा. शरद (भाऊ) लाड यांनी केला आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातूम पलूस – कडेगाव मधील गरजू व्यक्तींना रक्तपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी कडेगाव तहसील कार्यालयातील श्री. अजित शेलार तहसीलदार साहेब यांनी या शिबिरासाठी सदिच्छा भेट दिली. त्याचप्रमाणे
डी. एस. देशमुख, नगरसेवक संदीप काटकर वैभव देसाई, अभिमन्यू वरूड़े
माऊली देशमुख,प्रविण करडे सागर लाटोरे, अतुल नांगरे, किरण चव्हाण, विशाल जाधव, सोमनाथ वायदंडे, रमेश जाधव, महेंद्र करांडे, सुरेश शिंगटे, विराज पवार, विनायक महाडीक, दीपक मदने, शाहिद पटेल, संभाजी पाटील, सोमनाथ घार्गे, सुनिल घार्गे सिकंदर मुल्ला, श्रीकांत थोरात, शाहरुख पटेल, राहुल जाधव, युवराज देसाई.युवराज जरग, किरण कुराडे, विशाल जाधव, रुकेश चौगुले, वकील विराग जांभळे
असे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीडशे युवकांनी रक्तदान केले.