कडेगांव चा कॅम्प्युटर बाळासाहेब मिसाळ यांचा तलाठी कार्यालयात सेवानिवृत्ती निमित्ताने केला सत्कार

Google search engine
Google search engine

कडेगांव चा कॅम्प्युटर बाळासाहेब मिसाळ यांचा तलाठी कार्यालयात सेवानिवृत्ती निमित्ताने केला सत्कार

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगांव येथिल तलाठी कार्यालयात कोतवालपदी १९९७ सालापासून कार्यरत असणारे बाळासाहेब मिसाळ यांचा सपत्नीक सेवा निवृत्ती निमित्ताने कडेगांवचे मंडल अधिकारी मनोहर पाटील व तलाठी विकास सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मंडल अधिकारी मनोहर पाटील, राजाभाऊ पाटील, करिष्मा मुजावर, कडेगांव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक नितिन शिंदे, रफीक तांबोळी ,ताजुद्दीन पटेल, अक्षय मिसाळ सौ. जयश्री मिसाळ उपस्थित होते. या सत्कारप्रसंगी बोलताना नितिन शिंदे म्हणाले की कडेगांव तलाठी कार्यालयातील महसुल विभागाचा चालता बोलता कॉम्प्युटर म्हणजे बाळासाहेब मिसाळ. कडेगांव शहरातील प्रत्येक व्यक्तीचा सातबारा तोंडपाठ असणारा व व्यक्ती पाहुन सातबारा काढून देणारा कडेगांव तालुक्यातील तलाठी कार्यालयातील महसुल विभागाचा एकमेव उत्कृष्ट कोतवाल म्हणजे बाळासाहेब मिसाळ हे २६ वर्षाच्या प्रदिर्घ कोतवाल पद सेवेतून निवृत्त होत आहेत. कडेगांव तालुक्यातील तलाठी कार्यालयातील कोतवालाच्या सेवानिवृत्तीच्या सत्काराला प्रथमच उपस्थित राहण्याचा योग आला.अशा या कडेगावच्या तलाठी कार्यालयातील चालत्या बोलत्या कॅम्प्युटरला म्हणजे कोतवालपदी सेवानिवृत्त झालेल्या बाळासाहेब मिसाळ यांना पुढील आयुष्यासाठी कडेगांव शहराच्या वतीने शुभेच्छा..