मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व तहसीलदार कार्यालय, कडेगाव संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह – युवा संवाद 2 ऑगस्ट 2023आयोजित.

Google search engine
Google search engine

मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व तहसीलदार कार्यालय, कडेगाव संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह – युवा संवाद 2 ऑगस्ट 202

 

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

महसूल दिनानिमित्त, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि तहसीलदार कार्यालय, कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑगस्ट 2023 रोजी “महसूल सप्ताह-युवा संवाद” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय डॉ.विजय देशमुख, उपविभागीय अधिकारी तथा प्रांतअधिकारी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत माननीय अजित शेलार, तहसीलदार कडेगाव उपस्थित होते.
नोडल अधिकारी श्री मोरे ए.एल. यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एस.व्ही.पोरे, NAAC- समन्वयक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कडेगावचे तहसिलदार अजित शेलार, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे रहिवासी दाखले, जातीचे दाखले, अधिवास, उत्पन्नाचे दाखले आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागिय अधिकारी डॉ.विजय देशमुख, यांनी विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या विविध सेवा व योजनांची माहिती दिली. महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून शासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यात विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन त्यांनी केले. महसूल विभागाच्या विविध भागांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मतदान कार्ड, जातीचे दाखले आणि उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय भाषण प्रा.डॉ.एस.व्ही.पोरे, NAAC- समन्वयक यांनी केले. सौ.शीला मोहिते, शारीरिक शिक्षण संचालक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.वाय.कदम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी कु.सानिया शिकलगार हिने केले.