वांगी गावातील अंतर्गत रस्ते चिखलमय : महिला वर्गाने दिले रस्ता दुरुस्तीसाठी सरपंचांना दिले निवेदन

Google search engine
Google search engine

 

  • वांगी गावातील अंतर्गत रस्ते चिखलमय : महिला वर्गाने दिले रस्ता दुरुस्तीसाठी सरपंचांना निवेद

सांगली/कडेगाव  न्युज:
वांगी (ता.कडेगाव) येथील ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक सहा भुहिरा येथील रस्ता चिखलमय झाल्यामुळे या वार्डामध्ये राहणाऱ्या महिलांनी रस्ता दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन गावच्या सरपंच सौ.वंदना सूर्यवंशी यांना दिले आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यावेळी सरपंच सौ.वंदना सूर्यवंशी यांनी निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करत उपाययोजना न करता काम करण्याचे आश्वासन देत महिलांची बोळवण केली.
यावेळी रुपाली गुरुराज विभुते, नंदिनी रामचंद्र मोहिते, संगीता दत्तात्रय मोहिते, दत्तात्रय मोहिते, सुनंदा गुरुराज विभते, नलिनी शंकर मोहिते, ग्रामपंचायत सदस्य हबीब पटवेकरी, माजी उपसरपंच बाबासो सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटणकर आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की वांगी ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक सहा मधील भुईरा या ठिकाणचे आम्ही रहिवासी असून बाळकृष्ण मोहिते ते गुरुराज सोमनाथ विभुते या ठिकाणचा रस्ता हा कच्चा आहे. तसेच तो सध्या पावसामुळे चिखलमय व खराब झालेला आहे. येथून गाड्या ये-जा करत असल्याने रस्त्याची परिस्थिती खूपच दयनीय झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यावर चालत जाणे देखील नागरिकांना अवघड जात आहे. तसेच हा रस्ता संपूर्ण चिखलमय झाल्यामुळे तसेच हा रस्ता खराब होऊन खड्डेमय झाल्यामुळे यात पावसाचे पाणी साठवून दुर्गंधी पसरत आहे. साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण येथील परिसरात वाढले आहे. तसेच या परिसरातील गटारांची अवस्था देखील खराब असल्यामुळे परिसरातील पाणी गटाराच्या माध्यमातून बाहेर निघत नाही. त्यामुळे डेंगू व मलेरिया सारखे आजार पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील वयोवृद्ध व लहान बालकांना किंबहुना सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. संसर्गजन्य आजाराची समस्या उद्भवल्यास त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतवर राहील. त्यामुळे ग्रामपंचायतीने या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर मुरूम टाकावा. आणि त्यानंतर तातडीने रस्त्याची डागडुजी करून नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवावा अन्यथा या परिसरातील नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल.
या निवेदनावर बाळकृष्ण राजाराम मोहिते, रामचंद्र अंकुश मोहिते, स्वप्नील शहाजी सितापे, प्रवीण सीतापे, संगीता दत्तात्रय मोहिते, दत्तात्रय मोहन मोहिते, नीता काशिनाथ मोहिते, काशिनाथ मोहन मोहिते, संदीप शिवाजी मोहिते, गुरुराज सोमनाथ विभुते, नलिनी शंकर मोहिते आदींच्या सह्या आहेत.

फोटो ओळ : वांगी ग्रामपंचायत सरपंच सौ.वंदना सूर्यवंशी यांना निवेदन देताना रूपाली विभुते, नंदिनी मोहिते, संगीता मोहीते व अन्य महिला.