सेवानिवृत संघटनेच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण महापूरे यांची निवड.

Google search engine
Google search engine

सेवानिवृत संघटनेच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण महापूरे यांची निवड

 

 

कडेगाव येथील शिक्षक बॅंकेच्या सभागृहात कडेगाव तालुका सेवानिवृत संघटनेची सभा झाली त्यामध्ये एकमताने तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण महापूरे यांची निवड झाली तर सरचिटणीसपदी शहाजी पाटील यांची निवड झाली.निवडीनंतर या दोघाचा सत्कार सभागृहात पार पडला. यावेळी निवडलेली कार्यकारिणी अशी:- कार्याध्यक्ष बाळासो धनवडे. उपाध्यक्ष:- विनायक महाजन व सुलोचना कोरे. खजिनदार:- बाजीराव जगदाळे. सल्लागार:- सुरेश धुमाळ, भिमराव पवार, प्रल्हाद चव्हाण.संघटक:-शोभा पवार, भानुदास महिंद.सदस्य:-शोभा खलिपे, केशव हादवे,आबासो जाधव, महादेव पोतदार.
यावेळी बोलताना जिल्हाअध्यक्ष मधुकर जंगम म्हणाले की राज्यसरकारने पेन्शनवर कर्ज न देताच हप्ता कपात करणे हे अन्यायकारक कारक असल्याने राज्यातील 2 लाख सेवानिवृत नाराज आहेत.ही बाब राज्यकर्ते यांचे निदर्शनास मुंबईत 23 तारखेला आणू व हा प्रकार बंद करण्यास सांगू.नाहीतर न्यायालयात जावू.यावेळी आटपाडीचे माणिक खंडागळे,खानापूरचे बाळासाहेब आडके, सांगलीचे सिध्देश्वर चेंडके यानी मनोगत व्यक्त केले.आभार प्रल्हाद चव्हाण यानी मानले.