पाणी संघर्ष समितीच्या वतीने छ.धर्मवीर संभाजी महाराज चौक कडेगांव येथे हायमोस्ट पोलचे लोकार्पण सोहळा संपन्न*.

Google search engine
Google search engine

*पाणी संघर्ष समितीच्या वतीने हायमास्ट पोल लोकार्पण सोहळा संपन्न*

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगांव येथे पाणी संघर्ष समिती तर्फे हायमास्ट लैम्प लोकार्पण सोहळा पार पडला. हायमस्ट पोल चे उद्घाटन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख व संयोजक अभिमन्यू वरूडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष डांगे,  व नगरसेवक विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष संदीप देसाई , माजी उपनगराध्यक्ष दिनकर जाधव,  विठ्ठल खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कडेगाव धर्मवीर छत्रपती  संभाजी महाराज चौक (स्टँड चौक) येथे रात्री पुरेसा उजेड पडत नव्हता, ही बाब अभिमन्यू वरूडे यांनी महामार्ग अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. महामार्ग वरिष्ठ अभियंता प्रकाश शेडेकर यांनी दोन हायमस्ट पोलची मंजुरी दिली व काम पूर्ण केले. यावेळी डी एस देशमुख व अभिमन्यू वरूडे म्हणाले की पाणी संघर्ष समितीच्या निवेदनानुसार लवकरच कराड विटा महामार्ग कडेला झाडे लावणे, अपघात होणार नाही अश्या ठिकाणचे अनावश्यक स्पिड ब्रेकर काढून टाकणे, नाले पूर्ण करणे, सुर्ली घाटाचे काम चारपदरी मंजुरीसाठी पाठविणे ही कामे राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर तर्फे होणार आहेत.

यावेळी असंख्य पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते,वसंत इनामदार, प्रविण करडे, जीवन करकटे, दिपक न्यायनीत, रघुनाथ गायकवाड, प्रकाश गायकवाड, युवराज जरग, अप्पा यादव, मोहन जाधव, अरुण अन्ना सगरे , नामदेव रासकर, बजरंग अडसूळ,भोसले मामा, प्रदीप देसाई, किरण कुराडे, विशाल जाधव, महादेव चौगुले, समरजीत गायकवाड, शिराज पटेल, सुरेश रासकर मान्यवर उपस्थित होते .