कडेगांव तालुक्यातील विहापूर येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव. प्रत्येक बुधवारी भरवणार आठवडा बाजार.

Google search engine
Google search engine

विहापूर मध्ये ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव.

प्रत्येक बुधवारी भरवणार आठवडा बाजार

 

 

सांगली/कडेगांव न्युज

कडेगांव तालुक्यातीलविहापुर येथे विशेष ग्रामसभेत गावामध्ये एक थेंब ही दारू विकली जाणार नाहीअसा दारूबंदीचा ठराव लोकनियुक्त सरपंच अश्विनी सयाजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजूर करण्यात आला. यावेळी उपसरपंच शरद नांगरे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रमुख उपस्थित होते.गुरुवारी झालेल्या या ग्रामसभे मध्ये दारूबंदी सह डिजीटल डीटॉक्स संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत मोबाईल, टीव्ही बंद करून सर्व मुलांना अभ्यास करण्यास बसवणे,दर बुधवारी आठवडा बाजार भरविण्या बरोबरच अशा सेविका म्हणून सविता कोकाटे यांची निवड करण्यात आली. ग्रामसभेत झालेल्या या ठरावाने विहापूर ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी माजी उपसरपंच विजय चव्हाण, अरुण चव्हाण, युवराज पाटील, श्रीरंग चव्हाण, सयाजी चव्हाण, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.