यंदा उत्कृष्ट मंडळाला भेटेल पारितोषिक…!

0
440
Google search engine
Google search engine

यंदा गणराया पुरस्कार 2023 ची घोषणा

मोतीबाग व्यायाम मंडळ व नागरिक हक्क संरक्षण समितीच्या प्रेरणादायी उपक्रम

शेगाव:- शेगाव संत नगरीमध्ये गणेशत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते यामध्ये अनेक मंडळे देखावे दाखवितात सामाजिकहीत जोपासणारी काही कार्य त्याचा समाजाला आपल्या देखाव्यातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात त्या माध्यमातून गणेश भक्त व लोकांपर्यंत एक चांगला संदेश पोहोचला पाहिजे हा एकमेव गणेश मंडळाचा उद्देश असतो. म्हणून शेगाव शहरातील मुख्य मिरवणुकीत सहभागी होणारे गणेश मंडळाकरिता हा पुरस्कार असून मंडळाच्या या सर्व बाबींवर लक्ष देत व चांगल्या गोष्टींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी यावर्षी नागरी हक्क संरक्षण समिती व मोतीबाग व्यायाम शाळा प्रसारक व बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून गणराया पुरस्काची २०२३,ची घोषणा किरणबाप्पू देशमुख यांनी केली की जेणेकरून गणेश उत्सव साजरा करीत असतांना युवकांमध्ये राष्ट्रीय एकता सामाजिक बंधुभाव व शिस्तबद्धता निर्माण व्हावी या उद्देशाने नाहस च्या माध्यमातून गणराया पुरस्कार ची घोषणा करण्यात आली सोबतच मुख्य मिरवणुकीत सहभागी नसलेल्या मंडळाकरिता सुद्धा सिद्धिविनायक पुरस्कार २०२३ याची सुद्धा घोषणा व माहिती देण्यात आली.
यामध्ये पुरस्कार प्राप्त गणेश मंडळांना उत्साह वाढवण्यासाठी फिरती डाल व प्रोत्साहन पर ११००० रुपये रोख बक्षीस अशी वितरित करण्यात येईल तसेच सिद्धिविनायक पुरस्कारांमध्ये फिरत चषक व ३००० रुपये रोख दिले जाईल आणि विशेष म्हणजे याकरिता कुठलाच मंडळाला फी आकारण्यात आलेली नाही हे सर्व निशुल्क राहील. याची नोंद गणेश मंडळांनी घ्यावी अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.या संबंधित पत्रकारांची संवाद साधला गणराया पुरस्कारा करिता मानके व त्याकरिता 100 गुण ठरविण्यात आले आहे. यामध्ये गणेशउत्सव साजरा करताना मंडळाला नियम व अटी लागू करण्यात आले आहेत या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या नियमाचे पालन करणाऱ्यांना हे बक्षीस दिले जाईल यामध्ये, “गणेश स्थापना करतेवेळी शिस्त व वेळ,राष्ट्रीय एकात्मता समाज बांधवांची देखावे,
गणेशोत्सव साजरा करताना १०दिवस मंडप परिसराची स्वच्छता व सुरक्षा,गणेश उत्सव साजरा करताना सकाळ व संध्याकाळ मंडळाचे वतीने करण्यात येणाऱ्या आरतीची पद्धत व वेळ, विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी मंडळाच्या पदाधिकार्‍याची वागणूक शिस्त व विसर्जनाची वेळ व मिरवणुकी दरम्यान वाद्याची ध्वनी प्रदूषण वाद्याचा प्रकार किंवा गीतांचे वैशिष्ट्य दहा दिवस किंवा मिरवणुकीच्या दरम्यान लक्षवेध समाजप्रबोधन राष्ट्रीय संदेश सामाजिक एकोपा व बंधुभाव तसेच समाजहितांचे लोकापयोगी कार्यक्रम” यासोबतच इतर सामाजिक कार्य करताना देखील त्याची दखल घेतली जाईल. म्हणजेच रक्तदान शिबिर,राष्ट्रीय एकात्मता, समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन विषयी कार्यक्रम, आरोग्य विषयक शिबिरे, स्वच्छते विषयी जनजागृती, ओला कचरा व सुका कचरा याविषयी जनजागृती, डेंगू निर्मूलन, प्लास्टिक निर्मूलन,अशी उपक्रम घेतल्यास याची दक्षता देखील दक्षता समिती घेईल या दक्षता समितीची कोणावर अन्याय होऊ नये तसेच पारदर्शकता राहावी म्हणून प्रत्येक विभागातील एक-एक पदाधिकारी यामध्ये घेण्यात आला आहे जी समिती गठीत केल्या जाणार आहे त्यामध्ये मोतीबाग व्यायाम शाळा प्रसारक मंडळ, नाहसांचा समिती, पत्रकार प्रतिनिधी, वकील संघाचा प्रतिनिधी, डॉक्टर संघाचा प्रतिनिधी, प्राध्यापक, तहसील कार्यालयाचा प्रतिनिधी, नगरपरिषचा प्रतिनिधी, पोलीस स्टेशनचा प्रतिनिधी, या प्रत्येक विभागातुन एक प्रतिनिधीची निवड केली जाईल. तसेच गणपती मंडळांची संख्या पाहता सिद्धिविनायक पुरस्काराकरिता वरील मान्यवरापैकी प्रत्येकी दोन प्रतिनिधींची समिती नेमण्यात येईल. हे प्रतिनिधी गुणांची पाहणी करून आपल्याला गुण संख्या दिल्या जातील. गुण देतेवेळी पारदर्शकता रहावी म्हणून वशिलेबाजी किंवा ओळखी पालखीला कुठलाही थारा दिला जाणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदे मध्ये नागरिक संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष किरणबाप्पू देशमुख यांनी दिली यावेळी नागरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विजय ढगे, निकुंज देशमुख, अशोक गडकर, महेश देशमुख, पंकज तापी, उमेश देशमुख, सागर देशमुख, यासीन भाई, संतोष देशमुख, गजानन घाईट गोकुळ तेल्हारकर, बाळू सोळंके, बसंत शर्मा, रतन ठाकूर व इतर सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.