कडेगांव तलाव व शिवाजीनगर कॅनाल जवळपास असणाऱ्या वाडीवस्तीसाठी तातडीने पाणी पुरवठा करावा याबाबत तहसिलदार अजित शेलार यांच्याकडे मागणी

Google search engine
Google search engine

कडेगांव तलाव व शिवाजीनगर कॅनाल जवळपास असणाऱ्या वाडीवस्तीसाठी तातडीने पाणी पुरवठा करावा याबाबत तहसिलदार अजित शेलार यांच्याकडे मागण

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगांव तलावातून ओढ्यावरील व शिवाजीनगर कॅनाल मधून वाडी वस्तीसाठी पाणी सोडावे या बाबतीत शेतकरी यांच्या वतीने निवेदन जेष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात जेष्ठ नेते आनंदराव रास्कर बापू, युवा नेते श्रीजय ऊर्फ बापुराव देशमुख , कृती समिती अध्यक्ष पत्रकार हिराजी देशमुख, शेतकरी दिपक शेडगे, शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते तहसिलदार अजित शेलार यांना देण्यात आले.

कडेगाव तलावावरील व शिवाजीनगर कॅनाल शेजारील वाड्यावस्तावरील विहरी पुर्णपणे आपल्या आहेत जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्याची आवश्या गंभीर बनली आहे.
यामुळे तातडीने शिवाजीनगर कॅनाल व कडेगांव तलावावरील अधिकारी यांना आदेश देण्यात बाबतीत विनंती करण्यात आली.
या निवेदनात कडेगांव शहर व शिवाजीनगर गावातील हद्दीतील असंख्य समाज बांधवांच्या सहयांचे निवेदन देण्यात आले.