मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगांव येथे एकदिवसीय नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

Google search engine
Google search engine

मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय येथे एकदिवसीय नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोज

 

 

सांगली /कडेगांव  न्युज:

सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 285- पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार कडेगाव यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नवीन मतदार नोंदणी व मतदार जागृती करणे करिता, भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथे “एक दिवशीय नव मतदार नोंदणी शिबिरा”चे आयोजन करण्यात आले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक विचारात घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहे व ज्यांचे वय १ ऑक्टोबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होऊ घातले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना-६, योग्य त्या कागदपत्रांसोबत भरण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अजित शेलार, तहसीलदार कडेगाव यांनी केले.
तसेच प्रमुख उपस्थिती माननीय सागर कुलकर्णी, नायब तहसीलदार यांनी नवीन मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. वाय. कदम यांनी लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क, अधिकार व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले.
सदर शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मतदानाचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले तसेच नवीन मतदार नोंदणी चे महत्व व मतदार जागृती संदर्भात विद्यार्थिनींनी भाषणे सादर केली. सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रा. मोरे ए. एल. नोडल ऑफिसर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रा. एस बी मोहिते मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माने मानसी सुहास या विद्यार्थिनींने केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.