नेर्लीची प्राथमिक मराठी शाळा ,उर्दू शाळा आदर्श मॉडेल स्कूल बनवणार…तालुक्यातील आदर्श मॉडेल स्कूल ला भेटी…सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार 

0
100
Google search engine
Google search engine

नेर्लीची प्राथमिक मराठी शाळा ,उर्दू शाळा आदर्श मॉडेल स्कूल बनवणार…तालुक्यातील आदर्श मॉडेल स्कूल ला भेटी…सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगांव तालुक्यातील नेर्ली गावची जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आणि उर्दू शाळा महाराष्ट्रातील आदर्श मॉडेल स्कूल बनवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्या दिशेने पाऊले उचलणे नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांनी चालू केले आहे, नेर्ली ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांची एकत्र बैठक घेऊन नेर्ली गावातील मराठी शाळा आणि उर्दू शाळांना महाराष्ट्रातील आदर्श मॉडेल स्कूल करण्यासाठी शाळेत, परिसरात काय सुधारणा करायला पाहिजे याची चर्चा झाली, बैठकीत ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत संचालक मंडळ आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक स्टाफ यांचा एकत्र अभ्यास दौरा तालुक्यातील आदर्श मॉडेल स्कूल जिल्हा परिषद शाळा खेराडे वांगी आणि जिल्हा परिषद शाळा उपाळे वांगी या शाळांना भेट देऊन पाहणी केली तेथील मुख्याध्यापक यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली, लोकसहभागातून आणि ग्रामपंचायत निधी आणि महाराष्ट्र शासन यांच्या निधीतून मॉडेल स्कूल नावाची चळवळ सांगली जिल्ह्यात फैलावत आहे,अश्या पोषक वातावरणात नेर्ली गावातील शाळा मॉडेल स्कूल करण्याचा इरादा नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार व्यक्त केला, या अभ्यास दौऱ्यात उपसरपंच प्रकाश कांबळे, ग्रामसेवक सुरेंद्र प्रताप, सदस्य संजय मोहिते, शंकर मुळीक, अभिजित वलेकर, सदस्या सुनंदा लोंढे, मुमताज मुजावर, संजीवनी पवार, गंगुबाई गायकवाड,मदिना आगा, मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय नरुले,शिक्षिका कविता बगाडे, पूजा पोतदार, शिक्षक शरद शेटे, मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पराग थोरात, उर्दू शाळा मुख्याध्यापक एहसान उलहक्क सय्यद, शिक्षिका वाहिदा सनदे,उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रईसा मोमीन, अंगणवाडी प्रतिनिधी शिक्षिका फर्जाना मुजावर यांनी सहभागी झाले होते