युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळाकडे वळावे.नगराध्यक्ष धनंजय देशमुख.

0
359
Google search engine
Google search engine
  1. युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळाकडे वळावे. धनंजय देशमुख

 

 

सांगली/कडेगाव न्युज

आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात असंख्य युवक मोबाईलच्या आहारी जाऊन मैदानी खेळ विसरत चालले आहेत. त्यामुळे तरूण युवकाची शारीरिक अवस्था कमकुवता होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे तरुणांमध्ये मोबाईल मुळे आळशीपणाचे प्रमाणात आढळून येत आहे.त्याचबरोबर युवकांनी निरोगी आयुष्यासाठी
मैदानी खेळ खेळले पाहिजेत. असे प्रतिपादन कडेगाव नगरपंचायतीचे युवा नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले ते गुरसाळे येथे झालेल्या राज्यस्तरीय माती गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये पै. प्रथमेश गोरे यांने द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांच्या सत्करावेळीं बोलत होते.
यावेळी शिवाजीराव देशमुख, सार्वजनिक बांधकाम सभापती पै.अमोल डांगे, कडेगांव तालुका पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष हिराजी देशमुख, नगरसेवक विजय खाडे, अशपाक पठाण निलेश लंगडे इत्यादी उपस्थित होते.