केंद्रातील व राज्यातील सरकार जनतेच्यामागे ठाम. संग्रामसिंह देशमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते कडेगाव तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीस ‘पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप.

0
429
Google search engine
Google search engine

केंद्रातील व राज्यातील सरकार जनतेच्या मागे ठाम.
संग्रामसिंह देशमुख

 

 

 

 

 

संग्रामसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते कडेगाव तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीस ‘पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप.पंतप्रधान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी जमा करत आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकार ही आता शेतकऱ्यांना नमो योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देणार आहे. महिला भगिनींना बस  प्रवासात ५० टक्के सूट अशा अनेक कल्याणकारी योजना सरकार घेत आहे. कारण हे सरकार जनतेच्यामागे ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.ते अमरापूर ता. कडेगाव येथे पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या पाणी टँकर वाटपाच्या व पाणी पुरवठा टाकीच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी अमरापूरच्या सरपंच सुनीता गडळे, अमरदीप मोरे, आनंदराव मोरे, दशरथ मोरे, पांडुरंग रूपनर, एकनाथ दादा, भानुदास काकडे, संपत बापू, मारुती पैलवान, अशोक जाधव, सोपानराव माने गुरुजी, राजेंद्र लाड, शिवाजी लाड, प्रताप लाड सर, अशोक लाड, संग्राम घार्गे, प्रमुख उपस्थित होते.

यावेळी भारतीय थलसेनेमधून सेवानिवृत्त झालेले राजाराम रूपनर, शिवाजीराव शिंदे सरकार यांचा सत्कार करण्यात आला.

हिंगणगाव खुर्द, सासपडे, आंबेगाव, वडियेरायबाग, अमरापूर, कोतीज, ढाणेवाडी, खेराडे विटा, भिकवडी, उपाळे मायणी, येतगाव अशा अकरा ग्रामपंचायतीस ‘पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप’ या ११ गावांना संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते पाणी टँकर चे वाटप करण्यात आले.
यावेळी शंकर घार्गे, विक्रम माने, संजय पवार, गणा आबा शिंदे, तुकाराम शिंदे, शंकर जाधव, बबन ढाणे, विकास माने, हणमंत ढाणे, बाळासाहेब धनवडे, सचिन माने, तातोबा जगताप, गजानन जगताप, सचिन जगताप, अमोल गायकवाड, अभिजित सावंत, शिवाजी सावंत, लक्ष्मण कणसे, ईश्वर कणसे, डॉ. सतीश जाधव, शिवाजी पोळ, अशोक मुळीक, मिथुन गायकवाड, राहुल वाघमोडे, राहुल शिंदे, धनाजी सराटे, बिरु दादा मस्के, दादासाहेब मस्के, लक्ष्मण माने, रामभाऊ माने, विशाल कांबळे, अधिक जाधव, अनिल जगताप यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

👉चौकट👇
” जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी मिळाली मिळालेल्या संधीचे सोने करत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना सांगली जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच राज्यात नव्हे देशात सलग तीन वर्ष सांगली जिल्हा परिषद भारतात प्रथम क्रमांकाने पुरस्कार तर राज्यात यशवंत पंचायत राज हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार वीस वर्षानंतर जिल्हा परिषदेला मिळवून दिला” संग्रामसिंह देशमुख.