शांतता कमिटीची बैठक संपन्न…!

0
365
Google search engine
Google search engine

:शांतता कमिटीच्या बैठकीत उघड्यावर मांस विक्री व अतिक्रमणाचा मुद्दा गाजला

एकोप्याने सार्वजनिक उत्सव साजरे करा-अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात
शेगाव :  आगामी काळात येणारे सार्वजनिक उत्सव एकोप्याने आणि आनंदाने साजरा करा असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांनी दि.11 सप्टेंबर रोजी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत
पुढील काळात असणाऱ्या गणपती उत्सव, पोळा आणि ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवा निमित्य पोलीस प्रशासनातर्फे या शांतता समिती बैठकीचे आयोजन वर्धमान भवन येथे करण्यात आले होते. यावेळी गणपती मंडळाना लोखंडी मंडपाचे निर्माण करू नये, रीतसर मीटर घेऊन विज घ्यावी. उत्सवा दरम्यान विविध समाजपयोगी उपक्रम राबवावे, डीजेचा वापर शक्यतो टाळावा, सामाजिक भावना दुखावतील नाही याची दक्षता घ्यावी, कायद्याचे उल्लंघन करू नका अशा अनेक विविध विषयावर मार्गदर्शन थोरात यांनी केले. यावेळी शेखर नागपाल, हाजी जुबेर यांनी उत्सवा दरम्याच्या अडचणीवर प्रकाश टाकला तर किरणबाप्पू देशमुख यांनी मोतीबाग उत्सव समिती तर्फे देण्यात येणाऱ्या गणराया पुरस्काराचे महत्व पटवून दिले.शांतता कमिटीच्या या बैठकीमध्ये बाजारातील उघड्यावर होणारी नॉनव्हेज विक्री तसेच अतिक्रमण हा मुद्दा गाजला मागील दीड महिन्याच्या काळात पोलीस प्रशासनाचा सर्व स्टाफ नवीन असल्यामुळे शांतता कमिटीच्या या बैठकीला इतरत्र सदस्यांची कमतरता दिसून आली तसेच संपूर्ण पत्रकारांना सुद्धा निरोप मिळू शकला नाही त्यामुळे इतरत्र सुज्ञ नागरिक आणि काही पत्रकारांनी सोशल मीडियावर याचा निषेध सुद्धा केला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक विवेक पाटील, या प्रमुख व्यक्ती स्टेजवर होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. सुशिलदादा वणवे यांनी तर आभार पीएसआय कातखेडे यांनी मानले.