कडेगांव पोलिस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

0
154
Google search engine
Google search engine

कडेगांव पोलिस स्टेशनच्या गणपतीची पालखीतून विसर्जन मिरवणुक धुमधडाक्यात

  1. सांगली/कडेगांव न्युज
  2. कडेगांव पोलिस ठाण्यामध्ये स्थापना केलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पोलिसांनी बंदोबस्ताचा ताण झुगारून देत नृत्याचा ठेका धरला. त्यामध्ये नागरिकही मोकळेपणाने सहभागी झाले. येथील कडेगांव पोलिस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आरती झाल्यानंतर ढोल-ताशांच्या, लेझीम च्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या सुरवातीलाच कडेगांव पोलिस ठाण्याच्या प्रांगणात पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वारकरी मंडळीच्या बरोबर ठेका धरला व त्यामध्ये येथील महीला पोलिसही सहभागी झाले. त्यामुळे ग्रामस्थांना अभिनेता सलमान खान याच्या दबंग चित्रपटातील चुलबुल पांडे या पात्राचीच आठवण झाली. कडेगांव पोलिस ठाण्याच्या गणपती विसर्जनात पोलिसांचे नृत्य पाहण्यासाठी कडेगांवमधील नागरिकही मोठ्या संख्येने जमले होते. ढोल-ताशां लेझीम व बॅन्जोच्या गजरात पालखीतून गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.पोलिसांवरील वाढत्या ताणामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. अशा उपक्रमांमधून ताण कमी करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केला आहे हे मात्र नक्की. या उपक्रमांमुळे पोलिसांना व समाजला दोघांनाही आनंद मिळाला.या मिरवणुकी मुळे मागील दोन वर्षांपूर्वी पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांनीही अशीच मिरवणुक काढली होती याची आठवण कडेगांव मधील जनतेला ग्रामस्थांना जाणीव झाल्याचे नागरीकातून बोलले जात आहे. असा हा स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे कडेगांव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचेही कडेगांव शहरातून अभिनंदन होत आहे