चांदुर बाजार :- शिरजगाव बंड चे माजी सरपंच जानरावजी मानापुरे यांचे निधन

0
475

 

अमरावती दि.२६ : माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, पीपल्स वेल्फेअर सोसायटीचे माजी संचालक व शिरजगाव बंड चे माजी सरपंच जानरावजी रोडाजी मानापुरे यांचे आज गुरुवार दिनांक २६ ऑक्टोंबर 2023 रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ते ७५ वर्षांचे होते.

सदा हसतमुख, प्रसन्न चित्त स्वभावाचे जानराव जी यांनी २६ जून १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० दरम्यान सरपंच पदावर असताना शिरसगाव बंड गावाच्या विकासामध्ये मोलाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात एक निष्ठावंत कार्यकर्ता, चांगले व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्याची खंत माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांनी व्यक्त करीत स्व जानरावजी यांच्या आत्म्यास शांती व मानापुरे परिवाराप्रती संवेदना व्यक्त केली. स्व जानरावजी मानापुरे यांच्या निधनाने गाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.