राष्ट्रीय महामर्गावरील कडेगांव ते ओगलेवाडी मार्गावरील रंबल स्ट्रिप ( जाचक स्पिडब्रेकर)काढण्याचे काम सुरू डी एस देशमुख यांच्या आंदोलनाचा दणका

Google search engine
Google search engine

*महामार्गावर जाचक स्पिड ब्रेकर काढणे सुरू : डी एस देशमुख*

 

कडेगाव ते ओगलेवाडी महामार्ग मधील जाचक स्पिड ब्रेकर आंदोलनाची दखल घेऊन काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोडवर दोनचाकी, चार चाकी गाडी ने कराड ते कडेगाव रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. असे पाणी संघर्ष समिती अध्यक्ष व पलूस कडेगाव राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष डी एस देशमुख म्हणाले. कडेगाव ते ओगलेवाडी महामार्ग मधील जाचक स्पिड ब्रेकर ह्या पट्ट्या 20 एम एम च्या आहेत त्यातील 84 पट्ट्या काढून 5 एम एम च्या करण्यात येत आहेत . त्यामुळे कमी हादरे बसुन मणक्याचे त्रास व कंबरदुखी त्रास व गाड्यांचे नुकसान होणार नाही. यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरूडे म्हणाले की गतिरोधक पुढे आहे वाहने सावकाश चालवा असे बोर्ड लावण्यास कोल्हापूर महामार्ग वरिष्ठ अभियंता प्रकाश शेडेकर यांना सुचविले आहे व असे बोर्ड लागतील . तरी असे बोर्ड दिसले की वाहने हळू व नियमानुसारच चालवावित.
स्पिड ब्रेकर बाबतीत लोकांच्या तक्रारी लक्षात घेऊन व महामार्ग मधील ईतर अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी पाणी संघर्ष समिती तर्फे डी एस देशमुख, जीवन करकटे, जगदीश महाडिक, सोमनाथ पवार, प्रविण करडे नवनाथ काकडे, तानाजी भोसले, बजरंग अडसूळ, मोहन जाधव, विशाल जाधव यांनी गटाराच्या पाण्यात उपोषण आंदोलन केले होते. मा. प्रांताधिकारी अजय शिंदे व महामार्ग अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेऊन अनावश्यक जाचक स्पिड ब्रेकर काढून टाकू असे लेखी आश्वासन दिले होते . जाचक स्पिड ब्रेकर काढून टाकणे व कमी उंचीचे स्पिड ब्रेकर बसविणे हे काम महामार्ग ठेकेदार करत आहेत. प्रवाशांना कराड ते कडेगाव हा महामार्ग सुखकर होणार आहे.