कडेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे एकदिवशीय लाक्षणिक उपोषणास सुरवात

मराठा आरक्षण साठी आमरण उपोषणास बसलेले मराठा समाजाचे क्रांतिसूर्य मा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देणेसाठी व मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र व राज्य सरकारने तातडीने सोडवावा या मागणीसाठी कडेगाव शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने उध्या मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण धर्मवीर संभाजी चौक कडेगाव येथे करण्यात येणार आहे.
यावेळी कडेगांव येथे सर्वपक्षीय एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छत्रपती संभाजी महाराज चौक कडेगांव येथे सुरवात यावेळी कडेगांव चे जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, सुरेशचंद्र थोरात, राजाराम गरूड, युवा नेते विश्वतेज देशमुख,उदयसिंह देशमुख,डी एस देशमुख,सुरेश यादव, हमंतराव जाधव, मनसेचे युवराज जरग,असिफ तांबोळी, शिवलांग सोनावणे, यांच्यासह ज्योती शिंदे, गितांजली पवार, आशा शिंदे याचेसह नगरसेवक दिनकर जाधव, विजय शिंदे, विठ्ठल खाडे, नितीन शिंदे संतोष डांगे आनंदराव रास्कर बापु, सागर सुर्यवंशी, उपस्थित होते
सायंकाळी 7 वाजता कँडल मार्च काढण्यात येणार आहे तरी कडेगाव शहरातील सर्व मराठा बंधू भगिनी,विध्यार्थ्यांनी,तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे मराठा आरक्षणास पाठींबा देणाऱ्या इतर सर्व समाजबांधव यांनी उपस्थित राहून पाठींबा व्यक्त करावा ही नम्रतेची विनंती आता नाही तर कधीच नाही एक मराठा कोटी मराठा