जयराम मोरे यांना उद्योग भूषण पुरस्कार प्रदान : कॉंग्रेस सेवादलाचा उपक्रम*

Google search engine
Google search engine

 

*जयराम मोरे यांना उद्योग भूषण पुरस्कार प्रदान : कॉंग्रेस सेवादलाचा उपक्रम

 

 

 सांगली/कडेगाव  न्युज :
सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. यावर्षीचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. कडेगाव तालुक्यातील हणमंतवडीये येथील क्रांतिसिंह उद्योग समूहाचे संस्थापक तसेच क्रांतिसिंह दूध संघाचे संस्थापक चेअरमन मा. जयराम (बापू) मोरे यांना सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा उद्योग भूषण पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार सोहळा सांगली येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे नुकताच पार पडला.
कडेगाव तालुक्यामध्ये गेली पंधरा वर्षे दुग्ध व्यवसायामध्ये काम करत असणाऱ्या जयराम बापूंना दुग्ध व्यवसायाचे क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल भारती सहकारी बँक चे संचालक डॉ. जितेश कदम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
क्रांती सिंह दूध संघाच्या माध्यमातून जयराम बापू हे गेल्या काही वर्षांपूर्वी दूध क्षेत्रामध्ये आलेल्या अभूतपूर्व अडचणीवर मात करून देखील खंबीरपणे आपला व्यवसाय आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपली विश्वासार्हता जपण्यामध्ये यशस्वी झाले आहेत . कडेगाव, खानापूर तसेच माण- खटाव भागात ग्रामीण दूध उत्पादकांना “अमूल” सारख्या संस्थेसोबत काम करत असताना सातत्याने चांगला दूध दर देत त्यांनी क्रांतिसिंह दूध संघाचे काम उल्लेखनीय पद्धतीने सुरू ठेवलं आहे. त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस सेवा दलाच्या राज्य महासचिव आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मालन मोहिते, माधुरी शहा, ( सचिव- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, प्रभारी सांगली जिल्हा), जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अजित ढोले, नंदाताई कोलप. (जिल्हा मागासावर्गीय सेल महिला अध्यक्ष, ) प्रतिक्षा काळे, जेष्ठ नेते अशोकसिंग रजपूत, पैगंबर शेख यांच्यासोबत मान्यवर उपस्थित होते.
सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह तथा सुरेश आप्पा घार्गे, कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या वतीने तालुकाध्यक्ष योगेश महाडीक, महिला अध्यक्षा सौ.नयना शिंदे, तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच हणमंतवडीये येथील ग्रामस्थांनी जयराम मोरे यांचे या पुरस्काराच्या निमित्ताने अभिनंदन केले आहे.