राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्या : भारतिय किसान संघाची मागणी*

Google search engine
Google search engine

*राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्या : भारतिय किसान संघाची मागणी

 

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

अखिल भारतीय किसान संघाच्या वतीने  सांगली जिल्ह्य़ातील शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी कडेगाव पलुस चे प्रांत अधिकारी श्री अजय शिंदे साहेब यांना जिल्हाध्यक्ष रघुनाथ पिसाळ, तालुकाध्यक्ष संपतराव मालुसरे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे, प्रताप पंडित व राम जाधव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थित राहून निवेदन दिले. या निवेदनात, सरकारने चालू अधिवेशन काळात प्राधान्याने जिल्हय़ातील ज्या तालुक्याच्या दुष्काळ जाहीर केलेला नाही त्याचे मंडल स्तरावर पुन्हा पाहणी करून तेथे दुष्काळ जाहीर करावा,शेतकर्‍यांची पाणी पट्टी 10 पटीने वाढविणारा अन्यायी 23 मार्च 2023 चा जल संपत्ती अधिनियम रद्द करण्यात यावा, विमा कंपनी कडून शेतकर्‍यांना त्वरित अग्रीम रक्कम नुकसान भरपाई मिळावी, शेतकरी वीजबिल थकित देणी माफ व्हावीत, शेतकर्‍यांना उसाची मंजूर एफ आर पी सह प्रतिटन 500 रुपये सरकारी बोनस मिळावा यासह अनेक मागण्या केलेल्या आहेत.