कडेगावं -पलुस तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत संपर्क अभियान प्रभावीपणे राबवा – संग्रामसिंह देशमुख 

0
111
Google search engine
Google search engine

कडेगावं -पलुस तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत संपर्क अभियान प्रभावीपणे राबवा -संग्रामसिंह देशमुख

 

 

 


सांगली/कडेगांव न्युज:

प्रभू श्रीराम हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे २२ जानेवारीला श्री रामाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर कडेगांव व पलुस तालुक्यात घर संपर्क अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख केले.

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने ५०० वर्षाच्या अखंड लढ्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान हिंदू घर संपर्क अभियान राबवण्यात येणार असून त्या निमित्ताने संग्रामसिंह देशमुख यांनी कराड जिल्हा संघचालक डॉ. मकरंद बर्वे यांची भेट घेऊन यासंदर्भात माहिती घेतली.

देशमुख म्हणाले, समस्त हिंदू समाजासाठी ही अभिमानास्पद बाब असून, या अभियानात पलूस, कडेगांव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, मंडल प्रमुख, पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे यावेळी अभियान प्रमुख व संघ कार्यकर्त्यांना देशमुख यांनी अभिवचन दिले.

यावेळी जिल्हा बौद्धिक प्रमुख प्रविण कदम सर, तालुका कार्यवाह  प्रताप पंडित, तालुका जागरण संच प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, कडेगाव उपखंड प्रमुख श्रीजय देशमुख, कडेगाव नगरपंचायत बांधकाम सभापती पै.अमोल डांगे, आरोग्य सभापती निलेश लंगडे, माजी विरोधी पक्षनेते  उदयतात्या देशमुख, विजय खाडे,अभिजीत लोखंडी,युवराज रजपूत, केदार कुंभार,अजित भैय्या यादव, संदीप भैय्या यादव उपस्थित होते.