सांगली जिल्ह्यातील कडेगांव शहारात महीलांचा शोभाखयात्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद!! संवाददात सामाजिक कार्यकर्ते सुहास कराडकर. 

Google search engine
Google search engine

सांगली जिल्ह्यातील कडेगांव शहारात महीलांचा शोभाखयात्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद!! संवाददात सामाजिक कार्यकर्ते सुहास कराडकर.

 

 

 

 

 

सांगली न्युज:

योध्या येथील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर कडेगांव येथे भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.या शोभा यात्रेस २५०० ते ३००० महीलांचा सहभाग होता.यावेळी ग्रिनपाॅवर शुगर गोपुज कारखान्याच्या विद्यमान चेअरमन सौ. अपर्णाताई संग्रामसिंह देशमुख,रेश्मा देशमुख, नगरसेविका विद्या खाडे,अस्मीता कराडकर,मनिषा रजपूत,रंजना लोखंडे,दिपाली चव्हाण,सायली कुलकर्णी,स्नेहा देशपांडे,याच्यासह विविध महीला मंडळांच्या सदस्या बचत गटाच्या महीला उपस्थीत होत्या. सकल हिंदु समाज्याच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये महिला, युवकांचा सहभाग मोठा होता.

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात २२ जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली व या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने कडेगांव येथे शोभा यात्रा झांज पथक व डीजेच्या दणदणाटात जल्लोषात काढण्यात आली. कडेगांव शहरातील ऐतिहासिक १८५ वर्षापुर्वीची परंपरा असणाऱ्या श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. झांज पथक व डिजेच्या व फटाक्यांच्या आताषबाजीत, प्रभू श्रीराम, माता सीता आणि हनुमान यांच्या मुर्ती मेघडंबरीत विराजमान झालेल्या रथातून, प्रचंड भक्तीमय वातावरणात व जयघोषात भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विविध संस्था, संघटनांतर्फे लाडू वाटप करण्यात आले होते. स्वागतासाठी मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. फटाक्याच्या आतषबाजीसह बाजारपेठेत रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. कडेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून ही रथयात्रा पुढे पुढे सरकत होती या शोभा यात्रेची सांगता श्रीराम मंदीर येथे झाली.व सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले एकुणच कडेगांव च्या इतिहासात २५००/३००० महीलांचा सहभाग व युवकांचाही तेवढाच सहभाग असणारी ही श्री प्रभु रामलल्लाची शोभायात्रा अत्भुत व मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.