शेगाव वकील संघाचे वतीने राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा

0
64
Google search engine
Google search engine

शेगाव वकील संघाचे वतीने राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा
शेगाव:-
शेगाव वकील संघाच्या वतीने दिनांक 25 जाने 2024 ते 28जाने 2024 या दरम्यान टेनिस बॉल क्रिकेटचे राज्यस्तरीय सामने आयोजित करण्यात आलेले आहे
या सामन्याचे उद्घाटन 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी नऊ वाजता ग.म. अभियांत्रिकी महाविद्यालय क्रिकेट मैदानावर होणार आहे या सामन्याचे उद्घाटन स्वप्निल खटि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा हे करणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे आर घाडगे दिवाणी फौजदारी न्यायालय शेगाव प्रमुख अतिथी म्हणून तदर्थ लक्ष्मीकांत बिडव ई जिल्हा व सत्र न्यायाधीश खामगाव व्हि डी साळवे मॅडम न्यायाधीश शेगाव जी ए तराळे न्यायाधीश शेगाव परीजात पांडे अध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र राज्य व गोवा अँड मोतीसिंह होता सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड बी के गांधी सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र हे प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत तसेच या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्यभरातून 16 संघ सहभागी झालेले असून सकाळी नऊ वाजता उद्घाटनानंतर लगेचच पहिला सामना घेण्यात येणार आहे अंतिम सामना 28 जाने 2024 रोजी घेण्यात येणार आहे या या स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस 71 हजार रुपये व आकर्षक चषक माननीय डॉक्टर आमदार संजय कुटे यांच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच द्वितीय बक्षीस 51000 हजार आकर्षक चषक विजय देशमुख यांचे वतीने देण्यात येणार आहे तसेच तृतीय बक्षीस 31000 शरद अग्रवाल माजी नगराध्यक्ष यांच्या वतीने देण्यात येणार आहे या या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शेगाव बार असोसिएशन जिल्हा बुलढाणा च्या वतीने करण्यात आले आहे