जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेने वार्षिक स्नेहसंमेलनाचेऔचित्य साधुन मातृ पितृ पुजनाचे केले आयोजन

Google search engine
Google search engine

 

सांगली कडेगांव न्युज:

जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेने वार्षिक स्नेहसंमेलनाचेऔचित्य साधुन मातृ पितृ पुजनाचे केले आयोज

कडेगाव येथील जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलीत श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचेऔचित्य साधुन विद्यार्थ्यांनी केले मातृ पितृ पुजन. विद्यार्थ्यानी आई वडीलाचे पाय धुवून पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून पुजन केले. आजच्या काॅम्प्युटरच्या युगात ही जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्यावर जे संस्कार शिक्षकांनी केलेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत.आपला समाजच संस्कार विसरत चालल्याचे एकीकडे दिसत असतानाच तेच संस्कार मुलांच्यात रूजवलेत जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेने विद्यार्थी यांचेवर असे संस्कार रूजवणे गरजेचे आहे.म्हणूनच जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेने स्नेहसंमेलनातच मातृ पितृ पुजनाचे आयोजन केले होते.जेणेकरून आजचे विद्यार्थी हे उद्याच्या देशाचे उत्कृष्ट नागरीक होतील. यावेळी जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे म्हणाले की मुलांनी पालकांचा आदर ठेवला पाहिजे. यासाठी पालकांनीही मुलांसमोर आपल्याआई वडीलांचा व घरातील वयोवृध्द व्यक्तीचा आदर ठेवावा त्यांची काळजी घ्यावी कारण मुलांच्यावर योग्य संस्कार घडतील त्याची सुरवात घरातून शाळेतूनच होत असते या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना राजाराम डांगे यांनी बोलताना सांगितले हा क्षण पाहील्या नंतर प्रत्येक पालकांचे मन भारावून गेले हा सुखद क्षण अनुभवताना संपुर्ण परिसरातील वातावरण आनंदाने गहीवरले होते. जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेने वार्षिक स्नेहसंमेलनातच मातृ पितृ पुजनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या मनात रोवलेले संस्कारच दिसून येत आहेत.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा पवार, अर्चना पवार, संगिता वेदपाठक, सुनिता शिंदे याच्यासह प्रविण कदम, अजित खाडे अभिजित जाधव सुहास भडांरे इत्यादी शिक्षक शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे स्नेहसंमेलन सह्याद्री मल्टीपर्पज हाॅलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडले