कडेगांव तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त पोलिस व सैन्यदलातील जवानांनी एक बिगर राजकीय समाज सेवा मंच स्थापन करावा–माजी सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन जाधव.

Google search engine
Google search engine

 

 

  1. कडेगांव तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त पोलिस व सैन्यदलातील जवानांनी एक बिगर राजकीय समाज सेवा मंच स्थापन करावा–माजी सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन जाधव

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगांव तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी/ अधिकारी व सैन्य दलातील जवान/ अधिकारी यांना अवाहन करण्यात येते की आपण सर्वजण देशसेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त झालेलो आहोत. त्याचा मोबदला म्हणुन सरकार आपणास पेन्शनही देत आहे. आपल्याला जेवढा पगार मिळत नव्हता त्याच्या कितीतरी पटीने जास्त पेन्शन घेत आहोत. हि पेन्शन सर्वसामान्य जनतेच्या खिशातून एक एक रूपाया जमा करून दिली जात आहे. हे आपण विसरून चालणार नाही याचा विचार करून आपण आपले पुढील आयुष्य हे सर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांना मार्गदर्शनासाठी, त्यांच्या संकटातील अडचणींसाठी एक बिगर राजकीय समाज सेवा मंच स्थापन करावी असे आवाहन बबन जाधव यांनी केले आहे. बबन जाधव बोलताना पुढे म्हणाले की आज देशात राजकीय पक्षांची काय अवस्था झाली आहे हे संपुर्ण देश उघड्या डोळ्यांनी पहात आहे. आता समाजाचा कोणावरही विश्वास राहीलेला नाही. सर्व सामान्य जनता ना पोलिसांच्यावर विश्वास ठेवायला तयार ना कायद्यावर विश्वास ठेवायला तयार ना न्यायालयावर विश्वास ठेवायला तयार हे असे होत राहिले तर समाजासाठी घातक आहे. समाजाचा कायद्यावर व न्यायदेवतेवर विश्वास बसावा यासाठी समाजाला मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहेया राज्यात पोलिसच सुरक्षीत नाहीत तर त्यांच्या कडून जनतेच्या सुरक्षिततेची काय अपेक्षा करणार हा पोलिसांचा दोष नाही कारण राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलिस खात्याचा खुळखुळा झालाय जो तो राजकीय पक्ष आपापल्या सोई नुसार पोलिसावर दबावतंत्राचा वापर करून पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. हे कोणीच नाकारू शकत नाहीत.याचा पुरावाच हवा असेल तो गेल्याच आठवड्यात जनतेसमोर आलेला आहे.अशा राजकीय दबावामुळे सर्वसामान्य लोकांना पोलिस न्यायच देऊ शकत नाहीत. एखाद्या राजकीय पक्षाचा गल्लीबोळातला कार्यकर्ता पोलिस ठाण्यात गेला तर पोलिस त्याला बसायला खुर्ची देतात.चहा पाण्याची व्यवस्था केली जाते. पण सामान्य नागरिक जर पोलिस ठाण्यात गेला तर त्याला पोलिस ठाण्याच्या बाहेर झाडाखाली बसवले जाते ही आजची वस्तुस्थिती आहे. एखाद्या पोलिसाने किंवा वरिष्ठ अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला भिक न घालता कायदेशीर कारवाई केली तर हेच राजकीय पक्षाचे लोक पोलिसांना, अधिकाऱ्यांना धमक्या देतात. अपशब्द बोलतात. पाच पन्नास कार्यकर्त्यांना जमा करून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढतात, हल्ला करतात.पोलिसांना व अधिकारी यांना मारहाण करतात जखमी करतात. पोलिसावर दहशत निर्माण करतात असेही प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन जाधव यांनी म्हटले आहे.पोलिस हा सुध्दा एक माणुसच आहे. त्याला संसार आहे, पत्नी आहे मुले आहेत मुलांचे शिक्षण आहे. याचाही त्यांना विचार करावा लागतो. या आपल्या लोकशाही देशामध्ये कायदा सर्वाना समान वागवितो. पोलिसांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने कायदा बनविलेला आहे. त्या कायद्याप्रमाणेच पोलिसांना न्याय द्यावा असे न्यायालयाचे आदेश सुध्दा झालेले आहेत. कायद्या प्रमाणे व न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे जर पोलिसांना त्यांचा हक्क व अधिकार बहाल केले तर पोलिस एकसंघ होतील ते कायद्याच्याच चौकटीत काम करतील त्याचा फायदा सर्व सामान्य माणसांना होईल. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची पंचाईत होईल. पोलिस आपले ऐकणार नाहीत. ते राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाहीत. कायद्याच्या चौकटीतच काम करतील या भितीने पोलिसांचे कायदेशीर असलेले हक्क व अधिकार या राजकीय पक्षाच्या लोकांनी हिरावून घेऊन पोलिसांना त्यांच्या हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. हा लोकशाहीला कलंक असून कायद्याचा व न्यायालयाचा अवमान आहे.आपण देश सेवा केली आहे आपल्याला शिस्त आहे कायद्याचे ज्ञान आहे संकटाचा सामना करण्याची हिम्मत आहे. याचा फायदा सर्व सामान्य लोकांना, सर्व जातीधर्माच्या लोकांना असे मनापासून वाटते असेही शेवटी प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात माजी सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन गणपत जाधव यांनी म्हटले आहे.