*बौद्ध समाजातील मतांचे विभाजन टाळा*- गुणवंत देवपारे ; बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी केले आवाहन

0
304
Google search engine
Google search engine

 

*पोटजातीच्या विळख्यातून बौद्ध समाज बाहेर पडणार*

अमरावती/प्रतिनिधी

भूतकाळाचा अनुभव लक्षात घेता बौद्ध समाजाने पोटजातीच्या विळख्यातून बाहेर यावे आणि संविधान वाचविण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून बळवंत वानखडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन करून गुणवंत देवपारे यांनी बौद्ध समाजातील मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच दक्ष राहून मतदान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माझे अनुभव, पुढील वाटचाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध उद्योजक तथा बौद्ध समाजातील व्यक्तिमत्त्व ज्यांनी दोन लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अमरावती लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवली असे गुणवंत देवपारे यांनी समाजातील लोकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.बनावट जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्या समाजाने दिली मात्र मी पहिल्यांदा बहुजन समाज पार्टी आणि नंतर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर दोन वेळा लोकसभा निवडणुकीत उभा राहलो तेव्हा प्रकर्षाने जाणवले की,वंचित च्या तिकिटावर जेव्हा उभा राहलो तेव्हा आधीपेक्षा पन्नास हजार मतांनी मागे यावे लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असलेले बाळासाहेब आंबेडकर यांचा आपल्याला अभिमान आणि आदर्श आहे परंतु समाजातील तथाकथित लोकांनी जिल्ह्यात वंचित ला केलेले मतदान ईतर उमेदवारांच्या तुलनेत कमी होते.त्यामुळे आता आनंदराज आबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे पुन्हा २०१९ च्या निवडणूकीची पुनरावृत्ती होणार असून आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत समाजातील किती लोक आहेत याची सुद्धा शाश्वती नाही तेव्हा समाजाचा निवडून येणाऱ्या
उमेदवाराच्या मागे आपण खंबीरपणे उभे असलो पाहिजे.
खोटे जात प्रमाणपत्राच्या चर्चेत असलेल्या नावाच्या सपर्धेत आंबेडकरी कार्यकर्ता मागे राहू नये म्हणून आपल्याला बलवंत बसवंत वानखेडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.आज ची लढाई ही संविधानाच्या आणि आंबेडकरी चळवळीच्या अस्तित्वाची लढाई असल्याने आपल्याला बलवंत वानखेडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.अनुसूचित जाती साठी राखीव मतदार संघाची ही शेवटची टर्म आहे तेव्हा यावेळी सच्चा कार्यकर्त्याचा आणि स्थानिक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन गुणवंत देवपारे यांनी समाजबांधवांना केले.
रिपाई च्या तालमीत तयार झालेले आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेले बळवंत वानखडे तळागाळातील कार्यकर्ते असून ते विजयी होतील याचा मला ठाम विश्वास आहे व समाजाने देखील ही खात्री बाळगावी.समाजातील बांधवांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता बळवंत वानखडे यांनाच निवडून द्यावे असे आवाहन गुणवंत देवपारे यांनी उपस्थितांना केले.मंगळवारी सायंकाळी क्षितिज पॅलेस येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.