वरवटी गावामध्ये वॉटर कप च्या माध्यमातून तुफान आले

0
971
Google search engine
Google search engine

वरवटी ता.अंबाजोगाई येथे पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बीड: नितीन ढाकणे

सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील पाच तालुक्याची निवड झाली असुन ,
यामध्ये अंबाजोगाई तालुक्याचा ही सहभाग आहे, वरवटी ता.अंबाजोगाई येथे पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
अनेक जेष्ठ, महिला , तरुण , लहान मुले, यांनी अक्षरशः गावाच्या मदतीने आणि गावातील सर्वांच्या सहभागातून गावात अक्षरशः वॉटर कप चे तुफान आले आहे , असेच चित्र निर्माण झाले आहे.


महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन हे आपल्या परिने अनेक कामे करीत असुन सामाजिक भावनेतुन दुष्काळाला हरविण्यासाठी व अशी गावे पाणीदार करण्यासाठी सिने अभिनेते अमिरखान व त्यांचे मित्र किरणराव यांनी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या वतीने वाँटर कप स्पर्धेची कल्पना नुसती मांडली नसुन गेल्या वर्षी अमलात आनुन यशस्वी करून  दाखवली.त्यावेळी अनेक गावांनी यात सहभाग घेवुन गावे पाणीदार केली अनेक गावांनी बक्षिसेही पटकावली.
या वर्षीसुध्दा वाँटर कप स्पर्धा ठेवण्यात आल्या असुन या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली असुन जिल्ह्यातील पाच तालुके निवडण्यात आले आहे.
दररोज शिवार फेरी काढुन कामाची आखणी करण्यात दंग आहेत हि स्पर्धा यशस्वी करणेसाठी परळीचे उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,क्रषी विभागाचे अधिकारी,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक व  पाणी फाऊडेशनची सर्व टीम जातीने मेहनत घेत आहे.

  (चौकट)
स्पर्धे पूर्वी करता येणारी कामे .
1) शोषखड्डे – 5 गुण
2) रोपवाटिका /नर्सरी  -5 गुण
3) माती परीक्षण -5 गुण
4) आगपेटीमुक्त शिवार (कम्पोस्ट खड्डे किंवा ढीग – बयोडायनामीक खड्डे – नाडेप )- 5 गुण
5) पाणी बचत तंत्रद्न्यान (ठिबकसिंचन -स्प्रिंकलर -मल्चिंग -बी बी एफ -बायोमास वापरून केलेले मल्चिंग ) – 5 गुण
6) अस्तित्वात असलेल्या
रचनांचे सर्वेक्षण पाहणी करून रिपोर्ट तयार करणे  – 3 गुण
असे एकूण – 28 गुण स्पर्धे पूर्वी मिळवू शकतो …
श्रमदान 20
यंत्रकाम 20
कोणत्याही अस्तित्वात असलेल्या 2  जुन्या रचनांची दुरुस्ती – 7
अथवा
विहीर पुनर्भरण
अथवा
नाविन्यपूर्ण उपक्रम शेवटच्या मुद्द्याला हे 2 मुद्दे  पर्यायी आहेत. 25  गुणासाठी काहीही करायचे नाही यामध्ये
संपूर्ण स्पर्धेची कामे गुणवत्तापूर्ण असली पाहिजे.

गुणवत्ता  – 10 गुण
माथा ते पायथा – 10गुण
वॉटर बजेट – 5 गुण
( विशेष चौकट)
सन्मानपत्र सह भरगच्च बक्षिसे
वाँटर कप स्पर्धे मध्ये उत्क्रष्ट काम करणाय्रा गावांना राज्य पातळीवरचे प्रथम बक्षिस 7 5लाख रूपये ठेवले   असुन दुसरे50लाखरू.तिसरे40लाख रू. तर तालुका पातळीवर सर्वोत्तम काम करणाय्रा गावांला 10लाखाचे बक्षिस व सन्मान पत्र देवुन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेच्या काळात जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगीरी करणाय्रा गावाकरिता हि स्पर्धा असुन गावे पाणीदार होवुन टँकरमुक्त व्हावी हा सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेचा उद्देश असुन हि कामे शासनाची यत्रंणा, सेवा भावी संस्था व लोकसहभागातुन होणार आहेत.