कमलाकर कोपले हल्ला प्रकरणी अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकार्‍यांना सर्वपक्षीय नेत्यांनी दिले निवेदन

0
940
Google search engine
Google search engine

कामलाकर कोपले हल्ला प्रकरणी अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकार्‍यांना सर्वपक्षीय नेत्यांनी दिले निवेदन

बीड: नितीन ढाकणे, दिपक गित्ते
अंबाजोगाई: अंबाजोगाई- भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कमलाकर कोपले यांच्यावर 9 एप्रिल सोमवार रोजी प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.या गंभीर घटनेचा शहरातील सर्व राजकिय पक्षांनी एकत्र येत जाहिर निषेध केला.  हल्ला करणार्‍या अशा विकृत व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी येथून पुढे अशा प्रकारच्या घटना शहरामध्ये घडू नयेत यासाठी अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकार्‍यांना सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी 11 एप्रिल बुधवार रोजी निवेदन दिले.

सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले व संतांची भूमी असलेले शहर आहे.अंबाजोगाई शहर हे मराठवाड्यातील पुणे म्हणून ही ओळखले जाते. या शहरामध्ये सर्व पक्षांचे पदाधिकारी तसेच नेते कार्यरत आहेत.परंतु,निवडणूक वगळता सर्वजण अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी एकत्रपणे काम करतात हे एक आदर्श उदाहरण म्हणून इतर जिल्ह्यातील लोक आदराणे पाहतात.गेल्या दोन दिवसापुर्वी अंबाजोगाई शहराच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना सोमवार,दि. 9 एप्रिल 2018 रोजी हनुमान नगर येथे घडली. अंबाजोगाई नगर परिषदेचे नगरसेवक कमलाकर शिवाजीराव कोपले यांच्यावर गुडांनी प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कमलाकर कोपले हे अजातशत्रु, मितभाषी व सुस्वभावी म्हणून त्यांची अंबाजोगाई पंचक्रोषीत ओळख आहे

अशा व्यक्तीमत्वाच्या व्यक्तीवर झालेला हल्ला हा वैयक्तीक हल्ला नसुन अंबाजोगाईच्या सुसंस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न आहे. याचा सर्व राजकिय पक्षाच्या वतीने जाहिर निषेध करत आहोत. अशा विकृत व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.जेणे करून येथून पुढे अशा प्रकारच्या घटना शहरामध्ये घडू नयेत. सदरील निवेदनाची दखल घेवून योग्य त्या अधिकार्‍यामार्फत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदरील निवेदनावर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, पालिकेचे पाणी पुरवठा सभापती बबनराव लोमटे,  पालिकचे बांधकाम सभापती सुरेश कर्‍हाड, नगरसेवक विजय जोगदंड,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, नगरसेवक सौ.कांचनबाई हणुमंत तौर,नगरसेवक संजय गंभीरे,नगरसेवक अनिसोद्दीन अन्सारी, नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मिलींद बाबजे, नगरसेवक संतोष शिनगारे, नगरसेवक दिलीप काळे, नगरसेवक अनंतराव लोमटे,नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक आसेफोद्दीन खतीब, नगरसेवक मनोज लखेरा,
नगरसेवक दिनेश भराडीया, नगरसेवक सय्यद असद,माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे, प्रा.सुलभा सोळंके, शिवसेनेचे प्रशांत आदनाक,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे,राणा चव्हाण,विजय भोसले,शैलेष कुलकर्णी, राजेश भिसे, शेख दाऊद,जहिरखान, युसुफखान,अर्जुन जाधव,
शेख जावेद, धर्मराज साठे, अ‍ॅड.अशोक मुंडे आदींसहीत इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.