आसिफा बलात्कार प्रकरणी अरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीचे तहसिलदार यांना निवेदन

0
813
Google search engine
Google search engine
8 वर्षीय अल्पसंख्यांक मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार करून नराधमांनी शेवटी आसीफा या मुलीचा गळा दाबुन खुन केला.
बीड :परळी नितीन ढाकणे

जम्मु काश्मीर राज्यातील कटुआ जिल्हयातील रासना गावात 8 वर्षीय अल्पसंख्यांक मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार करून नराधमांनी शेवटी आसीफा या मुलीचा गळा दाबुन खुन केला. अशा नराधमांना फाशीची शिक्षा दयावी या मागणीचे निवेदन ऑल इंडिया कौमी तंजीम तर्फे तहसिलदार मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. निवेदन देते वेळेस ऑल इंडिया कौमी तंजीमचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद अल्ताफ शहर अध्यक्ष, सय्यद सादेक तालूका अध्यक्ष, शेख शारेख, युवा अध्यक्ष सय्यद साजेद, शेख जावेद, शेख निजाम, शेख फिरोज, शेख खदीर यांच्यासह अन्य उपस्थित होते.