परळी उपजिल्हा रूग्णालय ’सलाईनवर’-वैजनाथ कळसकर

0
752
Google search engine
Google search engine
वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळेच परळी उपजिल्हा रूग्णालयात खालील सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
परळी
:परळी तालुक्यातील सर्व सामान्य लोकांच्या आरोग्यासाठी 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय उभारले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून परळी उपजिल्हा रूग्णालयच सलाईनवर असल्याचे पहावयास मिळत आहे.
सविस्तर माहिती अशी की, उपजिल्हा रूग्णालयात विविध तपासण्या काही दिवसांपासून बंद आहेत तसेच औषधांचा तुटवडा असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातून येणार्‍या गोर-गरीब रूग्णांची हेळसांड होत आहे. संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळेच परळी उपजिल्हा रूग्णालयात खालील सुविधांचा बोजवारा उडाला आहे.  यात प्रामुख्याने स्त्री-रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, दंत रोग तज्ञ उपलब्ध नसणे, एक्स-रे मशीन सतत बंद असणे, रक्त तपासणी सीबीसी मशीन सतत बंद असणे, तसेच लहान मुलांना दिला जाणारा व्हीटॅमीन ’ए’ चा डोस मागील 1 वर्षांपासून पुरवठा खंडित आहे. तसेच लहान मुलांना व मोठयांना दिल्या जाणर्‍या अँटीबायोटीक, मल्टीव्हिटॅमिन व इतर अनेक औषधांचा मागील कित्येक महिन्यांपासून तुटवडा आहे. यासह रॅबीजच्या इंजेक्शनचा नेहमी तुटवडा असणे, तसेच त्वचा रोग संबंधी औषधे नसणे, मधुमेह तपासणी युनिट बंद असणे, रूग्णांना लागणारे डिसपोजेबल सीरींज व नीडल बाहेरून आणावयास सांगणे इत्यादी समस्यांनी परळी उपजिल्हा रूग्णालयास घेरले असल्यामुळे परळी शहरातील व तालुक्यातील सर्वसामान्य गोर-गरीब रूग्ण आजारांच्या उपचारापासून वंचित राहून त्यांच्या जीविताचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. उपरोक्त नागरी आरोग्य सुविधांची सोडवणूक व औषधांचा नियमित पुरवठा यासह इतर समस्या तात्काळ न सोडवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, जिल्हा सचिव रवीराज नेमाने, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, तालुका उपाध्यक्ष संजय राठोड, नवनाथ कदम, शहर उपाध्यक्ष बालाजी रापतवार, महेश शिवगण, सुमित कलशेट्टी, शहर सचिव ऋषिकेश बारगजे, आत्माराम खंदारकर, संतोष कचरे आदिंनी प्रसार माध्यमास दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.