औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी वै. येथे “शिक्षक दिन” उत्साहात साजरा.

0
838
Google search engine
Google search engine

सर्वांना शिक्षण मिळण्याच्या लढ्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे – अमोल वाघमारे (बीड जिल्हाध्यक्ष S F I)

प्रतिनिधी :- नितीन ढाकणे

आज ५ सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन याचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वांना शिक्षण मिळण्याच्या लढ्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन विध्यार्थी नेते स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे बीड जिल्हा अध्यक्ष अमोलजी वाघमारे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे तारतंत्री व्यवसायाचे गटनीदेशक श्री काबरे सर हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की ” शिक्षक हा समाजाचा आरसा आहे , विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे काम शिक्षक करत असतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. ज्ञानेश्वरी गित्ते व संस्थेचे माजी विद्यार्थी दिपक मुंडे यांनी केले.

या कार्यक्रमाला विदर्भ २४ न्यूज चे व लोक हिंद न्यूज चॅनल चे पत्रकार दिपक गित्ते , कराड सर, देशपांडे मॅडम, सावंत सर,सोलवंडे सर, कल्याणकर सर, रोटे सर, सुपलकर सर व संस्थेतील सर्व विध्यार्थी उपस्थित होते.