राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या बोगस डॉ.गांधीची अखेर पोलीसांसमोर शरणागती ; आरोपीस दि.१९ पर्यंत पिसीआर

0
1181
Google search engine
Google search engine

आकोट(प्रतीनीधी) राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या आकोटातील बोगस डॉ.प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ.निखिल गांधी अखेर आज आकोट शहर पोलिसांना शरण आला. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याचा अटकपूर्व जामीन नाकारला होता.त्यामुळं पोलीसांना शरण येण्या शीवाय त्यासमार्ग नव्हता.आरोपी बोगस डाँ.निखील गांधी जवळ कोणताही वैद्यकीय परवाना नसतानाही अकोट सिटी हाँस्पिटल मधे रुग्णाच्या तपासणी करुन उपचार करीत होता अश्या तक्रीवरुन वैधकीय अधीक्षकाच्या पथकाने तपासणी केली असता.पथकाला अनियमीतता आढळुन आली.याबाबत पोलीसात तक्रार देण्यात आली असता पोलीसांच्या पारदर्शक तपासामुळे नमूद गुन्ह्यात शहरातील प्रतिष्ठित व धनाढ्य डाँक्टरांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले.याप्रकरणात आरोपींनी न्यायालयातून अटकपूर्व जामीनासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही पोलीसांच्या पारदर्शक व योग्य तपासामुळे त्यांचा प्रयत्न फोल ठरला.. गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात आतापर्यंत बोगस डॉ.गांधी सह , डॉ. केला व डॉ.राठी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत .पैकी आज बोगस डॉ.गांधीच्या शरणागती मुळं ईतर आरोपीही लवकरच पोलीसांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकणारातील आणखी दोन आरोपी डाँ.केला व डाँ. राठी हे अद्यापही फरार असुन ते सुध्दा लवकरच पोलिसांना शरण येण्या शिवाय पर्याय नसल्यामुळे शरण येण्याची शक्यता आहे.दरम्यानअकोट न्यायालयाने बोगस डाँ.निखील गांधी अटकपूर्व जामीन या आधीच नाकारला होता.पोलीस तपासातील पारदर्शक पणा व तपासणीसाठी असलेले पुरावे पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन नाकारला होता.न्यायालयाच्या निर्णयाने व पोलीसांच्या पारदर्शक तपासाने सामान्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत.