कवठा बहादूरा ग्राम मध्ये वाघाची दहशत.

0
84
Google search engine
Google search engine

 

कवठा येथे वाघाच्या दहशतीमुळे गाव हादरले संपूर्ण गावामध्ये भीतीचे वातावरण

अकोला :- बाळापुर तालुक्यातील कवठा बहादुरा या गावांमध्ये मागील काही दिवसापासून वाघ आढळून आल्याची घटना तेथे ग्रामस्थांनी सांगितली हा वाघ मागील काही महिन्यापासून तिथे फिरत आहे. एवढेच नाही तर त्याने जंगलातील वन्य प्राणी फस्त केल्यानंतर आता त्याची धाव शेतकऱ्यांच्या धावणीकडे म्हणजेच त्यांच्या गाई,बैल यांच्याकडे लागली आहे काही दिवसा अगोदर गावाची गावा जवळी ल एका शेतकऱ्याच्या बैलाची शिकार करीत आता या वाघाने आपली भूक भागवण्यासाठी गावामध्ये धाव घेतली आज सकाळी ०४ चार वाजताच्या सुमारास गावातील जगन्नाथ डांबरे यांच्या वाड्यात जाऊन त्यांची गाय या वाघाने फस्त केली आतापर्यंत हा वाघ शेत शिवाराच्या आजूबाजूला दिसत होता परंतु आता गावामध्ये दिसत आहे त्यामुळे कवठा ग्राम मध्ये भीतीचे वातावरण झाले आहे तेथील बहुतांश जनता ही शेतकरी आहे अशा परिस्थितीत हे शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन शेतात जात आहे. अशा परिस्थितीत या वाघाचा बंदोबस्त करण्या ची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहे तरी शासनाने प्रशासनाने व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देत या वाघाला जेल बंद करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी येथे ग्रामस्थ करीत आहे.