नाथ प्रतिष्ठान श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव खाली हात आया था, खाली हात जायेगा सुप्रसिध्द कव्वाल अजीज नाजाच्या कव्वालीला परळीकरांची वाह-वाह

0
835
????????????????????????????????????
Google search engine
Google search engine
बीड : नितीन ढाकणे, दिपक गित्ते
बाजीराव मस्तानी, पद्मावत या सुपरहिट हिंदी चित्रपटातील गायक, कव्वाल मुस्तबा अजिज नाजा यांचा गुरूवार दि.19 सप्टेंबर रोजी कव्वाली मुकाबला आयोजित करण्यात आला होता. या मैफीलीत श्री गणरायाला वंदन करीत कव्वालीच्या मुकाबल्यास सुरूवात झाली. 
          नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवातील सातव्या दिवशी कव्वाल मुस्तबा अजिज नाजा यांचा कव्वाली मुकाबला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरूवात श्री गणरायाच्या गीताने झाली. तर तुने दिवाना बनाया तो मे दिवाना बना, चढता सुरज धीरे धीरे ढलता हे ढल जायेगा अशा अनेक फेमस कव्वाली सादर करत अजीज नाजा व सहकार्‍यांनी कार्यक्रमात रंगत आणली. या कव्वाली मैफीलीत ना. धनंजय मुंडे यांनीही उपस्थित राहुन या कार्यक्रमास दाद दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. जाबेरखॉ पठाण, अय्युब भाई पठाण, राजा खान, शकील कुरेशी, जाफर खान, अजिज कच्छी, नाजेर हुसेन, शेख शरीफ भाई, शेख सिराज, जानिमियॉं कुरेशी, ताज खान पठाण, अल्ताफ पठाण, जमील अध्यक्ष, रफीक पटेल, गफर काकर, कुरेशी मेहबुब, वाजेद खान, लालाखान पठान आदींच्या हस्ते झाले. तर ना. श्री. धनंजय मुंडे यांनी कव्वाल मुस्तबा अजिज नाजा यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज सुप्रसिध्द सिनेतारका मानसी नाईकचा लावण्याचा कार्यक्रम
आज शुक्रवार दि.21 सप्टेंबर रोजी सिनेतारका मानसी नाईक, राधिका पाटील, माया पुणेकर प्रस्तुत मदमस्त अप्सरा हा लावणी कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रींची आरती
बुधवार दि.19 सप्टेंबर रोजी सायंकाळी नाथ प्रतिष्ठानच्या श्री गणेशाची आरती तेली समाज बांधवांच्या हस्ते झाली. तर गुरूवार दि.20 सप्टेंबर रोजी सकाळी श्री. सुशिल बुद्रे यांनी श्रींची आरती केली.