मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती च्या निमित्ताने मालाड पूर्व च्या विदर्भ शाळेत
नुकताच “चला शोधू स्वत:तील सावित्री” हा उपक्रम साजरा झाला. कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेतील
विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.
थियेटर ऑफ रेलेवंस अभ्यासक आणि शुभचिंतक यांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
‘विचार प्रेरणा नाट्य जागर’ अंतर्गत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित “मैं औरत हूँ” ह्या
नाटकाचे सादरीकरण झाले. नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर आणि ‘होणार सून मी ह्या घरची’
मालिका फेम कोमल खामकर ह्या कलाकारांनी अभिनय केला. कार्यक्रमाचे निवेदन रंगकर्मी तुषार म्हस्के यांनी केले.
माजी आमदार विद्याताई चव्हाण, वैभव भरडकर, मुख्याध्यापक उत्तम कुंभार, मुख्याध्यापिका विनया म्हात्रे,
शाळेचे विश्वस्त-सचिव विरेंद्र गुल्हाणे आणि ‘थियेटर ऑफ रेलेवंस’च्या अभ्यासक स्वाती वाघ ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.