क्रीडा मंत्रीही म्हणाले, “बस पाच मिनीट और..!”

167

क्रीडा मंत्री कबड्डी खेळले अन् खेळाडूंचा उत्साह वाढला.

  • गगन नारंगच्या स्टॉलला भेट देताना नेम धरण्याचा मोह मंत्र्यांना आवरला नाही.
  • खेळाडुंबरोबर टेबल टेनिसही खेळले..

पुणे दि. 10 : कबड्डी, टेबल टेनीस, लगोर, नेमबाजी या सारख्या आवडीच्या खेळांचा आस्वाद घेताना क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनाही “बस पाच मिनीट और”…म्हणण्याचा मोह आवरला नाही. निमित्त होते खेलो इंडीया स्पर्धे दरम्यान राष्ट्रीय युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे (एन.वाय.सी.एस.) आयोजित इंडीया का खेलोत्सव उपक्रमाच्या भेटीचे.

महाळुंगे-बालेवाडी येथे युवकांसाठी  राष्ट्रीय स्तरावरील “खेलो इंडीया 2019” स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेच्या ठिकाणी मुलांना खेळा विषयी आवड निर्माण व्हावी, क्रीडा क्षेत्रातील करीअरची ओळख व्हावी यासाठी खेलोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमला क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली.

यावेळी श्री विनोद तावडे यांनी कबड्डी, टेबल टेनीस, लगोर आणि नेमबाजी या खेळाचा आनंद घेतला. तसेच रिले धावणे, वॉल क्लायंबींग, तिरंदाजी, फुटबॉल या खेळांच्या मैदानावर जावून त्या संबंधी माहिती घेतली.  खेळ खेळण्यासाठी आलेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करा. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथे उपस्थित असलेल्या क्रीडा प्रशिक्षकांनी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

या ठिकाणी आलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांशी श्री तावडे यांनी संवाद साधला. खेलो इंडीया बघून काय वाटते, कोणते खेळ खेळायला आवडतात.. यांसारखे प्रश्न विचारून श्री तावडे यांनी मुलांशी संवाद साधला. खेलोत्सवात लावलेल्या प्रत्येक स्टॉलला जावून क्रीडा मंत्री श्री तावडे यांनी माहिती घेतली. खलोत्सवाच्या मैदानावर बराच वेळ रमलेल्या क्रीडा मंत्र्यांनाही या निमित्‍त “बस पाच मिनीट और”… म्हणण्याचा मोह आवरला नाही.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।