शेगांव येथे महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन संघटनेचे अधिवेशन

0
1705
Google search engine
Google search engine

शेगांव:- महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन 28 जानेवारीला संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे
सोमवार दिनांक 28 जानेवारी 2019 रोजी दुपारी तीन वाजता आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे पाटील यांच्या हस्ते होणार असून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून या विभागाचे खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉ. संजयभाऊ कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार श्रीकांत देशपांडे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहुल बोंद्रे ,आमदार डॉ. संजय रायमुलकर आमदार अँड. आकाश फुंडकर बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे, माजी आमदार दिलीप सानंदा, शेगावच्या नगराध्यक्ष शकुंतलाबाई बुच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनामध्ये औरंगाबादचे विधानपरिषद सदस्य आमदार अतुल भावे व हिंगोलीचे विधानसभा सदस्य आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून आमदार डॉ. संजयभाऊ कुटे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे शेगाव सारख्या ठिकाणी पहिल्यांदाच आयोजित होणार्‍या राज्यस्तरीय टंकलेखन लघुलेख संघटनेचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश कराळे वरिष्ठ उपाध्यक्ष विर कुवर महासचिव शैलेंद्र पाटील या राज्यस्तरीय टंकलेखन-लघुलेखन महासंघ अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अरुणभाऊ चांडक व मिलिंद मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य गण जोरदार तयारी करताना दिसत आहेत अधिवेशनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आल्याची माहिती आयोजक कडून देण्यात आली आहे.