चांदूर रेल्वे वनविभागाने केले चार मृत बटेर पक्षी जप्त – देवगावच्या गावरानी वऱ्हाडी ब्यावर कारवाई

0
673
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकाऱ्याने  वन कर्मचारीसह  बुधवारी(ता.५) धामणगाव
तालुक्यातील देवगावच्या गावरानी वऱ्हाडी धाब्याची तपासनी केली असता तेथे चार मृत बटेर
पक्षी पंख काढलेल्या अवस्थेत आढळले.चांदूर रेल्वे वन विभागाने या प्रकरणात एकाला वन्य
जिव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
सविस्तर वृत्त असे की चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी कर्मचाऱ्यांसह
धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगावच्या गावरानी वऱ्हाडी धाबा येथे पाहणी केली असता चार
मृत बटेर पक्षी पुर्ण पंख काढलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी आरएफओ आशिष
कोकाटे यांनी मृत बटेर जप्त करून प्रथम वन गुन्हा क्रमांक १०/०५ दि.५/०७/१७ अन्वये
आरोपी पांडुरंग विठ्ठल भबुतकर रा.नागापूर ता.धामणगाव रेल्वे याला अटक करून वन्यजिव
संरक्षण अधिनियम १९७२ कलम २(१६), (३६),९, ३९, ४८ए, ५० व ५१ अन्वये गुन्हा
दाखल केला. या कारवाईमध्ये आरएफओ आशिष कोकाटे, वनकर्मचारी श्रीमती शेंडे, कु.रेखे,
नाईक, हिवराळे, आखरे, वानखडे, वनरक्षक पवार, वाहन चालक पंचभाई, वनमजुर रामु
तिडके, पठाण, रफीक, शालिक पवार, जाधव खेकाळे, दशवत यांनी महत्वाची भूमिका पार
पाडली. या प्रकरणी अमरावती उपवनसरंक्षक हेंमत मीना व सहाय्यक वन संरक्षक ए.डब्ल्यु
कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे पुढील
तपास करीत आहे.