संविधान चौक नागपूर येथे आम आदमी पक्षाचे निदर्शने

0
656
Google search engine
Google search engine

 

खासदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

नागपूर :-

 

 

 अमरावती जिल्ह्यातील मेलघाट मध्ये होत असलेल्या बालमृत्यु प्रकारनाबाबत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता काल राज्याचे आरोग्य मंत्री श्री सावंत यांना निवेदन दयायला गेले असता शिवसेनेचे खासदार व् कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करुन गुंडगिरीचे प्रदर्शन केले आहे. त्याचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध करत आहे.

 काल आप चे कार्यकर्ते अमरावती जिल्ह्यातील मेलघाट मधील बालमृत्यु होणाऱ्या वाढीच्या मुख्य प्रश्नावर राज्याचे आरोग्य मंत्री श्री दीपक सावंत यांच्यासोबतनिवेदन देवून चर्चा करीत होते. ज्यावेळी बालमृत्यू मध्ये वाढ होत आहे, आपण या गोष्टीचे गाभिर्य जाणून घ्यायला पाहिजे, आणि तातडीचे उपाय करायला पाहिजेत अशी विनंती केली. आपले सरकार येन्या पूर्वी मेलघाट मध्ये वर्षाला 300-350 बलकांचा मृत्यु होत असायचा. आता हि संख्या ५५० च्या वर गेली आहे. तेव्हा सेनेचे खासदार आनंदराव अडसूळ अचानक आक्रमक झालेत आणि कार्यकर्त्यांना इशारा केला. यावेळी कार्यकर्ते आणि स्वतः आप च्या कार्यकर्त्यांना मारहाण करू लागलेत.

मेळघाटमध्ये एका वर्षात 500च्या वर कुपोषित बालकाचा मृत्यु, 180 अभ्रकाचा मृत्यु, 22 गर्भवती माता दगावल्या आणि वर्षानुवर्ष मेळघाटात मृत्युतांडव सुरुच आहे, मेळघाट मधिल बालमृत्यु दर 314 वरुन500 वर का पोहचला याचा जाब विचारणे काय गुन्हा आहे? अशा प्रकारचे प्रश्न केल्यास जनतेला किंवा इतर पार्टीच्या कार्यकर्त्यावर बळाचा वापर करून दडपशाही करण्याचा सेनेचा मनसुभा कालच्या घटनेतून जनतेसमोर आला आहे. हा प्रश्न फार गंभीर स्वरूपाचा आहे, याकुपोषणाच्या समस्येवर कोणी आवाज उठवू नये, यासाठी आरोग्यमंत्री श्री सावंत व खासदार श्री अडसुळयांनी काल गुंडागर्दी करुन सिद्ध केले आहे.

 

शिवसेना एकीकडे सत्तेवर बसून सत्तासुख भोगू इच्छिते तर दुसरीकडे सरकार विरोधी विधाने करतांना दिसून येते. हे केवळ जनतेची दिशाभूल करणे आहे. बालमृत्युचा एवढा गंभीर प्रश्न जर  मंत्री किंवा खासदार समजून न घेता दादागिरी करत असतील तर देशाचे भवितव्य काय असेल?

म. मुख्यमंत्री राज्याचे गृह मंत्री आहेत त्यांना आमची विनंती आहे कि सत्तेत असलेल्या आपल्या मित्रपक्षालाबालमृत्यू प्रकरणात गंभीर नसेल, तर यांना सत्तेत राहण्याचा काय अधिकार आहे. हा प्रश्न निर्माण होतो.

 

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की सत्तेतला मित्रपक्ष जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल, तर त्यामुळे संपुर्ण सरकारची प्रतिमा खालावते. तसेच महाराष्ट्रामधे कायदा आणि सुव्यवस्थेचे जे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याचा अर्थ एकच आहे की महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. किमान या घटनेमध्ये योग्य कार्यवाही करुण महाराष्ट्राला गृहमंत्री आहे आणि ते काम करत आहेत हे आपण दाखवून दिले पाहिजे.

शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसुल व कार्यकर्ते यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना जनतेचे प्रश्न मांडते वेळी जी मारहाण केली त्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच महत्वाचा जो बालमृत्यू चा प्रश्न आहे, याबाबत निष्क्रिय आणि दोशी मंत्री श्री दीपक सावंत यांना आपल्या मंत्रीमंडळातून निलंबित करावे. अन्यथा आम आदमी पार्टी या मुद्यावर तीव्र आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही.

आज आम आदमी पार्टी कडून या घटनेचा निषेध करण्यासाठी संविधान चौक नागपूर येथे तोडला काळी फीत बांधून आपला मुख विरोध दर्शविला.

 आज संविधान चौकात भारत रत्न ड़ॉ बाबासाहेब आम्बेडक याच्या पुतल्यासमोर तोंडावर काली पट्टी बांधूंन निषेध व्यक्त केला, यावेळी अशोक मिश्रा, अम्बरीष सावरकर, देवेंद्र वानखड़े, जगजीत सिंह, कविता सिंगल, सोनू ठाकुर, चंद्रशेकर पराड, प्रभात अग्रवाल, प्रशांत निलात्कार, बालू बंसोड़, वंदना मेश्राम, देवेंद्र परिहार, संजय जीवतोड़े, जीतेन्द्र मुतमुरे, राकेश दवे, अमित बड़वाइक, गणेश रेवतकर, ईश्वर गजबे, शंकर इंगोले, भूषण डाकुलकर, अतीश तायवाड़े, मनोज पोतदार, सुरेश खर्चे, मनोज सोनी, पियूष धापुलकर, सुभद्रा यादव , अविराज थूल, अमित पिसे, अजय धर्म, सुनंदा खैरकर, दुर्गेश खरे, एम झेड काझी, मनोज शर्मा, आतिश मेश्राम इत्यादि कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.