​​*जामिया या रसुल अल्लाह मदरस्यामध्ये वृक्षारोपण व इद मिलन कार्यक्रम संपन्न*

0
596
Google search engine
Google search engine

 

अचलपूर  / श्री प्रमोद नैकेले /-

शहरातील विलायत पुरा स्थित मदर्सा जामिया या रसुल अल्लाह मध्ये मदर्स्याचे बानी निसार खान चिस्ती व पत्रकार मो अज़हरुद्दिन द्वारा भव्य वृक्षारोपण व इद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले ज्यामध्ये अचलपूर वन परीक्षेत्र अधिकारी  शंकर बारखडे,सामजिक वनीकरन अधिकारी दीपक हिंगनीकर,अचलपूर चे थानेदार आधारसिंह सोनोने,वरिष्ठ पत्रकार प्रमोद नैकेले,डाँ निलेश खंडेलवाल ,योगेश खानझोडे, प्रजापती व्यासपीठावर  उपस्थित होते.याप्रसंगी वन परीक्षेत्र अधिकारी बारखडे  यांनी पर्यावरण संरक्षण हेतू मार्गदर्शन करतांना सांगीतले की आज 33 टक्के जंगलांची आवश्यकता आहे.ज्यामुळे अापल्याला जीवन सुखाने जगण्याचा आनंद मिळतो.  थानेदार आधारसिंह सोनोने यांनी आज वृक्षारोपण करने झाडे़ लावने आवश्यक आहे. वृक्षामुळे अनेक लोक स्वस्थ जीवन जगत आहेत. असे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे.यामुळे समाजात एकतेचा संदेश जाताे.त्यानंतर सामाजिक वनीकरन चे दीपक हींगनिकर यांनी सर्व वृक्षांची माहिती देत त्यांचे महत्व समजावले.कार्यक्रमाचे संचलन व आभार मो अज़हरुद्दिन यांनी केले यावेळी निसार खान चिस्ती  बानी ए जामिया या रसुल अल्लाह,  पत्रकार फिरोज खान,हाफिज़ इमरान नुरी.,डाँ मुजीब, अँड अतहर,डाँ ज़ाहेद,मो शाहज़ाद नुरी,सादिक बाबू,युसुफ़ खान ,कैसर खान,मो वसीम नुरी,हाफिज़ तज़िन व असंख्य नागरीकांसोबत मदरस्याचे विद्यार्थी उपस्थीत होते.