​*महानुभवांचे तिर्थ क्षेत्र अष्टमासिध्दी विविध धार्मिक भावनांचे तिर्थक्षेत्र*

0
1001
Google search engine
Google search engine

अचलपूर /श्री प्रमोद नैकेले/-

अचलपूर तसेही विविध सामाजिक, शैक्षणिक,ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरानी प्रसिध्द शहर तशातच येथे विविध धार्मिक भावनांचे सुध्दा जतन केल्या जाते.

अचलपूर नगरी एके काळचे राजधानी चे शहर म्हणून ओळखले जाते येथे आजही ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष त्या इतिहासाचे पुरावे देत आहे.या शहरात विविध समाजाचे भिन्न जातीचे नागरीक आपल्या सामाजिक परंपरा जपून एकोप्याने राहतात.शिक्षणाची गंगोत्री  विविध सामाजसेवकांनी बरेच वर्षापूर्वी येथे आणली त्यामुळे शैक्षणिक वारसा आजही या शहरात परंपरेने सुरु आहे.संगीत,नृत्य,चित्रकला,नाटक व साहित्य या सांस्कृतिक परंपरांचे हे माहेरघर राहिलेले आहे.अश्याच प्रकारे या शहरात धार्मिक भावनांचे सुध्दा जतन केल्या जाते.येथे विविध धार्मिक परंपरा आजही जपल्या जातात.

 

सुलतानपूरा व जिवनपूरा येथे बालाजी संस्थान असून तेथे उत्सवात पारंपारिक लोटांगण होतात येथे शेकडो भाविक दर्शनाला येतात.अशा अनेक धार्मिक परंपरा या शहरात जपल्या जातात.असेच एक ठीकाण अचलपूर शहरात आहे जेथे विविध धार्मिक भावना जुडलेल्या आहेत.येथे चक्रधरस्वामी यांचे वास्तव्य असल्याचे महानुभाव पंथाच्या धार्मिक ग्रंथ लिळाचरीत्रात उल्लेख आहे त्यामुळे हे महानुभवांचे तिर्थ क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर झाले तेंव्हा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण यांचे पदस्पर्श झाल्याचे सुध्दा पुराणात म्हटल्या जाते तसेच महानुभाव भगवान श्रीकृष्णाचे पुजक असून या ठिकाणाला या पंथात फार महत्त्व आहे.महानुभव अनेक संत या स्थळावर आपले वास्तव्य व तपश्चर्या करून गेल्याचे म्हटल्या जाते.अष्टमासिध्दी हे स्थळ एका वेगळ्या परंपरेने सुध्दा प्रसिद्ध आहे येथे एक विहीर असून या विहिरीच्या पाण्याची महिमा सर्वदूर पसरलेली आहे.या पाण्याने स्नान केल्यास त्वचारोग चांगले होतात ही निसर्गाची कमाल आहे हे पाणी गंधकयुक्त असल्याने त्वचा रोगांना प्रतिबंध करण्यास मदत होते अशी वैज्ञानिकांचे दृष्टीने सांगण्यात येते तर जुने लोक येथील विहीरीत आसरामातांचे वास्तव्य असल्याचे बोलल्या जाते त्यामुळे आसरामातांच्या आशिर्वादाने आपले रोग बरे होतात अशी धार्मिक संकल्पना आहे.मात्र एक गोष्ट निश्चित की विहिरीच्या पाण्याने स्नान केल्यास रोगमुक्त होते त्यामूळे दुरवरून असंख्य भावीक येथे येतात मनोभावे पूजा करून बकेटमध्ये कापूर जाळून मनोभावे विहीर व आसरामातेला नमन करून पाण्याने स्नान करता विशेष म्हणजे आपल्या लहान बालकांना अष्टमासिध्दी येथे हमखास आणून एकवेळ तरी विहिरीच्या पाण्याने स्नान करतात.अचलपूर नव्हे तर आसपासच्या जवळपास सर्वच जिल्ह्यातील लोक या प्रथेला मानतात व देशात इतरत्र राहणारे येथील नागरिक एकवेळ तरी येथे येऊन आपल्या लहान मोठ्या परिवारातील सदस्यांना या पाण्याने स्नान घालतात.आठवड्यात बुधवार व शुक्रवार ला येथे यात्रेचे स्वरूप येते.भाविक येथे नवस बोलतात व ते फोडण्यासाठी मोठया प्रमाणात येथे अन्नदानाचे प्रयोजन करतांना दिसते.येथे बीट्यांचे अर्थात रोडग्यांचे जेवन फार मोठ्या प्रमाणात होत असते.अष्टमासीध्दी येथे या विहिरीचे महात्म सर्व जातीधर्माचे लोक मानतात हे स्थळ परतवाडा अमरावती रोडवर अचलपूरच्या पूर्वेला आहे.महानुभव पंथासोबत इतर जातीधर्माचे हे स्थळ तिर्थक्षेत्र बनलेले आहे.