​*मुसळखेड्यात गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात – आ.डॉ.अनिल बोंडे यांनी केले गुरू पूजन*

0
564
Google search engine
Google search engine


वरुड : तालुक्यातील तीर्थश्रेत्र मुसळखेडा येथील श्री.संत यशवंत बाबा संस्थान येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे व डॉ.वसुधा बोंडे यांनी सपत्नीक गुरु श्री.योगीराज महाराज यांचे दर्शन घेऊन गुरुपूजन केले. गुरुपौर्णिमा निमित्त निघालेल्या पालखी व दिंडी सोहळ्याचे दर्शन घेऊन उपस्थित भाविक भक्तांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छ्या प्रदान केल्या. यावेळी शंकरराव चोबितकर, शालिनीताई चोबितकर, शशिकांत उमेकर (वकील) यांच्यासह योगीराज महाराज संस्थ्येचे पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते