जलयुक्त शिवारातील निकृष्ठ बांधकामात अधिकाऱ्यांचे हात ओले

0
623
Google search engine
Google search engine

अधिकाऱ्यांकडे असलेल्या संपत्ती चौकशीची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे 

 

धामणगांव रेल्वे  / श्री मंगेश भुजबळ /-

 

महाराष्ट्र शासनाच्या प्राधान्य क्रमात असलेली जलयुक्त शिवार योजना ही निकृष्ट बांधकामातुन पैसा लाटण्याचा कंत्राटदारांचा व संबंधित विभागाचा  धंदा झाल्याचे अनेक प्रकार समोर येत असल्याने जलयुक्त शिवार ही ”घोळयुक्त शिवार”झाल्याचे निदर्शनास  येत आहे. मात्र या योजनेतील नियमबाहय कामावर प्रशासकिय यंत्रणा डोळेझाक करत असल्याचे समोर येत आहे.
धामणगांव तालुक्यातील पाणी टंचाई व दुष्काळग्रस्त गावांना जलयुक्त शिवाराचा लाभ दिला गेला असुन यामध्ये नाला खोलीकरण सिमेंट बंधारे, गाळ काढणे,  शेततळे, समतल चरखोदाई अशा विविध कामांचे नियोजन करुन जलस्तर वाढविण्यासाठी कोटयावधी रुपयांची उलाधाल महाराष्ट्र शासन करित आहे. यामध्ये वेगवेगळया विभागांना ही जलयुक्त शिवाराची कामे राबविण्यासाठी कोटयावधींचा निधी  उपलब्ध करुन दिला जातो. त्र संबंधित विभागाच्या अर्थकारणामुळे या कामांचा बटयाबोळ झाल्याचे चित्र धामणगांव तालुक्यात पहावयास मिळाले आहे.
राज्यात गाज्यावाज्या करत जलयुक्त शिवार योजना राबविल्या जात असली तरी निकृष्ट कामांच्या साखळीने ही योजना अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या घशात जाणार की काय ही परीस्थिती निर्माण झाली आहे.एकंदरीत विरुळ रोंघे येथे मागिल वर्षी जलयुक्त शिवारातील कामे करण्यात आली असता या कांमांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार सुध्दा उघडकिस आला होता. यात योजनेअंतर्गत येणारी ही  100 टक्के एदाखवुन अंदाजपत्रकातील  कामांची देयके काढुन लाखो रुपयाचा अपहार केल्याची सुध्दा वास्तविकता आहे.या अपहारातुन राहीलेल्या 35 टक्के  कामाचे सुध्दा वाट लावल्याचे परिस्थिती नुकत्याच विरुळ रोंघे येथे झालेल्या निकृष्ट बांधकामावरुन दिसुन येत आहे.

शाखा अभियंताच्या  अर्थकारणाने वरीष्ठ अधिकारी  अडचणीत

धामणगांव तालुक्यासह चांदुर उपविभागात जलयुक्त शिवार योजनेची कामे जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता अवाळे यांच्या अधिकार कक्षेत व निरीक्षणात  येत असताना अंदाजपत्रकाची प्रत त्यांच्याकडे नसल्याने सदर कामांचे मोजमापांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असुन मागील 2 वर्षात अवाळे यांच्या निरीक्षणात असलेल्या कोणत्या  कामांची किती  अंदाजपत्रके तयार झाली ?  देयके किती अदा केली व किती टक्के काम झाले याची चौकशी केली तर स्पष्ट होईल असे चित्र दिसुन येत आहे.

शाखा अभिंयता कामांविषयी देतात वरीष्ठांना ”ऑल इज वेल” चा  संदेश

जलयुक्त शिवारातील ही कामे घेतांना व मंजुर करतांनाग्रामपंचायतीचा ठरावासह अध्यक्षांच्या उपस्थितीत   झालेल्या आढावा बैठकित संबंधित विभागाचे उपविभागीय अभिंयंता हे स्वत: उपस्थित राहणे गरजेचे असतांना मात्र जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या चांदुर रेल्वे उपविभागातील  शाखा अभियंता अवाळे हेच उपस्थित असल्याचे पहायला मिळाले आहे विशेषत: या आढावा बैठकिनंतर सदर कामाविषयी सर्व ”ऑल इज वेल” असल्याचा संदेश शाखा अभियंता अवाळे यांनी  दिल्याने वरिष्ठ अधिकारी अडचणीत आल्याची माहीती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी बोलुन दाखविले आहे.

जलयुक्त शिवारातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा – शेतकऱ्यांची मागणी

 

एकीकडे चांदुर रेल्वे उपविभागातील जलयुक्त शिवार योजनेची मंजुर झालेल्या  कामे  त्या कामाचे शाखा अभिंयता आवाळे हे आहेत मात्र अंदाजपत्रक उशिरा बनवून सदर कामे नेमकी पावसाळयाच्या तोंडावरच का सुरु होतात ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे कोटयावधींच्या कामात निरीक्षक म्हणुन असलेल्या जलसंपदा विभाग,कृषी विभाग, पाटबंधारे विभाग,सामाजिक वनीकरण विभाग इत्यादी  विभागांमार्फत  जलयुक्त शिवारातील बांधकामात होत असलेल्या कोटयावधींच्या कामात भ्रष्टाचाराचे  पाणी मुरत असल्याने प्रामाणीकतेचा वाव आणणाऱ्या सर्व अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.