​अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे आयोजन

0
938
Google search engine
Google search engine

बुलडाणा :- 
खामगांव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सेमिस्टर एक ते पाच चे आयोजन करण्यात आल आहे. ही परीक्षा 10 ऑगस्ट 2017 पर्यंत होणार आहे. त्यानुसार नियमित व माजी प्रशिक्षणार्थ्यांनी परीक्षेला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव येथे उपस्थित रहावे.

  सदर परीक्षेचे वेळापत्रकानुसार 19 जुलै रोजी सकाळी 9.30, 2.30 या वेळेस पेपर होणार आहे. त्याचप्रमाणे 20 जुलै रोजी सकाळी 9.30 व 2.30, 21 जुलै रोजी 9.30 व 2.30, 22 जुलै रोजी 9.30 व 2.30, सोमवार 24 जुलै रोजी सकाळी 9.30 व दुपारी 2.30, 25 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता, 26 जुलै सकाळी 9.30, 27 जुलै सकाळी 9.30, 28 जुलै सकाळी 9.30 वाजता, 31 जुलै रोजी सकाळी 10.30 व 2.30 वाजता, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 व 2.30 वाजता, 2 ऑगसट रोजी सकाळी 9.30 व 2.30, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 व 2.30, 4 ऑगस्ट रोजी 10.30 व 2.30, 5 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट व 10 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 व दुपारी 2.30 वाजता परीक्षा घेण्यात येणार आहे.   परीक्षेचे वेळापत्रक संस्थेच्या सुचना फलकावर लावण्यात आलेले आहे,  असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी कळविले आहे.