​अमरावती विभागीय रूग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 12 पदांची निर्मिती

0
830
Google search engine
Google search engine

अमरावती विभागातील रुग्णांना अतिविशेष सेवेचा लाभ मिळेल- पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

  अमरावती-:

येथील विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उच्चस्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 12 पदांच्या निर्मितीस आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विभागातील रुग्णांना अतिविशेष सेवेचा लाभ व अधिक चांगले उपचार मिळतील, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी व्यक्त केली आहे.

यापदांच्यानिर्मितीमुळे विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, ऑन्कॉलॉजी, न्यूरोसर्जरी आदी अतिविशिष्ट सेवा सुरू होणार असून त्यांचा लाभ अमरावती विभागातील    आत्महत्याग्रस्त पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे.या निर्णयाबद्दल पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत.

पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, नुकतीच मी अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाची पूर्व पाहणी केली. त्यानुसार आवश्यक सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांना विनंतीही केली. अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा असल्याने ते सुरु होण्यासाठीही मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

  

           

अतिविशिष्ट सेवा उपलब्ध होणार

ग्रामीण भागातील रूग्णांना तज्ज्ञ चिकित्सा सेवा मिळावी यासाठी राज्यातील महसूल विभागाच्या       मुख्यालयीविभागीय संदर्भ सेवा रूग्णालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार अमरावती 

येथेविभागीय संदर्भ सेवा रूग्णालय सुरू करण्यात आले असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील पदनिर्मिती झाली  असून संदर्भ सेवाही सुरू झाल्या आहेत. या रूग्णालयाचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी आणि त्या माध्यमातून 

रुग्णांना अतिविशिष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 12 उच्चस्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांना (वेतनश्रेणी 1560039100, ग्रेड पे 7600) मंजुरी देण्यात आली. यामध्ये कर्करोग तज्ज्ञ,  कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ, 

कर्करोग विकार विभाग बधिरीकरण तज्ज्ञ, किरणोपचार तज्ज्ञ, क्ष किरण शास्त्रज्ञ, मेंदू व मज्जारज्जू विकार 

तज्ज्ञ, मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया तज्ज्ञ, मेंदू व मज्जारज्जू विकार विभाग बधिरीकरण तज्ज्ञ, शरीरविकृती 

शास्त्रज्ञ, हृदय विकार तज्ज्ञ, हृदय विकार विभाग बधिरीकरण तज्ज्ञ, हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ या पदांची 

निर्मिती करण्यात येणार आहे