देऊरवाडा गावात पोलिसांनी केले पायदळ पेट्रोलिंग- अवैध धंद्यावर धडक मोहीम. अवैध धंदेवाल्यांना सक्त ताकीद

0
669
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील ठाणेदार श्री मुकुंद कवाडे यांनी अवैध दारू विक्रेते ,अवैध दारू विक्रेते यांच्या वर धडक कार्यवाही चे सत्र सुरू केले आहे.ज्याच्या घरी दारू विकताना आढळल्यास त्याच्या घरातील फ्रीज आणि ज्या मध्ये दारू आणि ज्याच्यावर दारूची वाहतूक होती अशी एकूण 22 मोटरसायकल,तसेच एक कार, असे अनेक साहित्य शिरजगाव कसबा पोलिसांनी ताब्यात घेतले.
होणाऱ्या प्रत्येक कार्यवाही मध्ये ठाणेदार कवाडे हे हजर  राहत होते त्यामुळे या कार्यवाही अधिकच सलग गतीने करण्यात आल्या असल्याचे समजत आहे
आज दिनांक 14 जून 2017 सकाळी 10 च्या सुमारास ठाणेदार श्री मुकुंद कवाडे आणि त्यांची टीम पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा च्या हद्दीत येणाऱ्या देऊरवाडा या गावामध्ये अवैध धंद्या विरुद्ध सक्त ताकीद आणि संपूर्ण अवैध बंद करावे असे पोलिसांकडून बजावण्यात आले आहे.

यावेळी ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यान्च्या समस्या समजून घेतला.पोलिसांनी आणि ठाणेदार कवाडे यांनी देऊरवाडा या गावामध्ये पूर्ण पोलीस टीम सोबत पेट्रोलिंग करण्यात आले.


रमजान महिना असल्याने शिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुववस्था टिकून राहावी आणि सामान्य जनतेला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्ण दखल घेण्यात येईल आणि कोणत्याही आरोपी संबंधात हयगय करणार नाही.

– ठाणेदार मुकुंद कवाडे